*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जात पडताळणी जनजागृती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जात पडताळणी जनजागृती*
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात जात पडताळणी जनजागृती*
नंदुरबार(प्रतिनीधी):-येथील पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळ संचलित ज. ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात 5 फेब्रुवारी रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गत शंभर दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत असून त्याअंतर्गत सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जातप्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार यांनी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी समितीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संशोधन अधिकारी सी. के. पाडवी यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र करिता लागणारी कागदपत्रे व त्यांचे महत्त्व समजावून सांगितले तसेच सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन याकरिता सदैव तत्पर असतो व सर्व प्रकारच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.एस के चौधरी व विनोद लोहार यांनी उच्च शिक्षणाकरिता जात प्रमाणपत्राचे महत्त्व व आवश्यकता यावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सौ वर्षा घासकडबी, प्रा. योगेश ठाकरे, प्रा. पवन सूर्यवंशी व प्रा. रणजीत सूर्यवंशी यांनी प्रयत्न केलेत. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ सुहासिनी नटावदकर यांनी शुभेच्छा दिल्यात.