*देवरे विद्यालयात आनंद मेळाव्याद्वारे खाद्य संस्कृतीचे प्रदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात आनंद मेळाव्याद्वारे खाद्य संस्कृतीचे प्रदर्शन*
*देवरे विद्यालयात आनंद मेळाव्याद्वारे खाद्य संस्कृतीचे प्रदर्शन*
नंदूरबार(प्रतिनीधी):-नंदुरबार तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे विद्यार्थ्यांना व्यावसायिक व व्यवहार ज्ञान व्हावे, खरेदी-विक्रीची अनुभूती व्हावी. या उद्देशाने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन विखरण गावातील सरपंच निर्मला रोहिदास साळुंके, पोलिस पाटील ॲड. दिपमाला पाटील, खोंडामळी केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख आनंद करणकाळ, मुख्याध्यापक डी. डी.साळुंके व पालक वर्गाच्या हस्ते करण्यात आले.इ.5 वी ते 10 वी वर्गातील विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले. त्यात भेळ, पावभाजी, कचोरी, इडली डोसा, बटाटा वडा, खमण, पाणी- पुरी, भजी, वडापाव, खमण, मसाला पापड, आपे चटणी, पोंगे बटाटे, गोड बोरं, पोहे, मिसळपाव, चिवडा इ. स्वरुपात ग्रामीण भागातील खाद्य पदार्थांचे स्टॉलद्वारे खरेदी विक्री करण्याचा प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थी व पालकांनी घेतली. सदर विविधांगी खाद्य पदार्थांचा आस्वाद विखरण, नाशिंदे, बोराळा, खापरखेडा येथील पाल्यांच्या आई- वडिलांनी व इतर नातेवाईकांनी, गावकऱ्यांनी घेतला. आनंद बाजारातुन आलेल्या अनुभवांचे कथन कु. देवर्षी पाटील, निकिता पाटील, वरुण पाटील, सुवर्णा पाटील, राज मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्रप्रमुख आनंद करणकाळ यांनी विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्याचे कौतुक करत भावी काळात हे अनुभव उपयुक्त ठरतील. यशस्वी व्यावसायिकाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. मेळावा यशस्वीतेसाठी एस. एच. गायकवाड, सी.व्ही.नांद्रे, डी.बी. भारती, एम.डी. नेरकर, आर.आर. बागुल, ए.एस. बेडसे, एम.एस. मराठे, व्ही.बी.
अहीरे, डी.बी. पाटील, एच.एम.
खैरनार, एस.जी. पाटील यांनी परिश्रम घेतले.