*कळसवली ग्रामपंचायतीतर्फे श्री गणेश जयंतीनिमित्त माझी वसुंधरांतर्गत जनजागृती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कळसवली ग्रामपंचायतीतर्फे श्री गणेश जयंतीनिमित्त माझी वसुंधरांतर्गत जनजागृती*
*कळसवली ग्रामपंचायतीतर्फे श्री गणेश जयंतीनिमित्त माझी वसुंधरांतर्गत जनजागृती*
राजापूर(प्रतिनीधी):-तालुक्यातील ग्रामपंचायत कळसवली यांच्या वतीने श्री गणेश जयंती उत्सवानिमित्त गणेश मंदिरात महिलांना माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत ग्रामसेवक सोनाली हिवाळे, पर्यावरण दूत सानिका बाणे, वरद ठाकूरदेसाई, अमित पांचाल यांनी जनजागृतीपर मार्गदर्शन केले पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी "माझी वसुंधरा (माय अर्थ)" हा अभिनव उपक्रम विभागाने हाती घेतला आहे. हा उपक्रम निसर्गाच्या "पंचमहाभूते" नावाच्या पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो. त्यात भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा समावेश आहे. या उपक्रमातून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्यांबद्दल नागरिकांना जागरूक करून त्यांना पर्यावरणाच्या सुधारणेप्रती प्रयत्न करता येत आहेत. त्यातून राज्याच्या शाश्वत विकासाप्रति प्रयत्न केले जात आहेत.