*कोतापूर शाळा व भू हायस्कूल मधील विद्यार्थ्यांंची विविध स्पर्धांमध्ये भरारी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोतापूर शाळा व भू हायस्कूल मधील विद्यार्थ्यांंची विविध स्पर्धांमध्ये भरारी*
*कोतापूर शाळा व भू हायस्कूल मधील विद्यार्थ्यांंची विविध स्पर्धांमध्ये भरारी*
राजापूर(प्रतिनीधी):-तालुक्यातील मौजे कोतापूर आणि भू गावातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली असून आपल्या अंगभूत कलागुणांच्या जोरावर सर्वच सोयीसुविधांचा अभाव असतानाही राजापूर तालुक्यात तब्बल दोन वर्षे विविध स्पर्धा व खेळामधून आपल्या यशाचा झेंडा फडकत ठेवला आहे. सन 2023 -24 शमिका शेवडे, 2024-25 मध्ये देवयानी आग्रे व शिवाली घुमे या विद्यार्थ्यांची नासा, इस्त्रोसाठी निवड झाली आहे याशिवाय शासकीय रेखाकला (इंटरमिजीएट ड्राईंग ग्रेड) परिक्षा 2024 -25 या वर्षात दिव्यराज तरळ, आशिष वालम, तेजस सुतार व नितेश नवाथे या चार विद्यार्थ्यांनी A ग्रेड मिळवली आहे तसेच अथर्व मांडवकर याची जिल्हास्तरीय खो- खो टिममध्ये निवड झाली आहे.तर शुभ्रा आंब्रे ही नृत्यार्पण अकादमीची सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनी ठरली आहे तर राजापूर हायस्कूलची रक्षा जांगळी ही विद्यार्थीनी राजापूर व कणकवली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोतापूर शाळेचे मुख्याध्यापक श्री बापूसाहेब गावडे, शिवाजी पाटील, योगेश पाटील, श्रीम.माधुरी जानस्कर, हायस्कूलचे मुख्याध्यापक विनायक शिवाजी जैतापकर, कलाशिक्षक सुर्यकांत प्रभाकर पुजारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर रांबाडे तसेच सरपंच सखाराम आग्रे, उपसरपंच विनायक सुतार, पालक वैभव आग्रे, वैभवी आग्रे आणि सदस्य ग्रामपंचायत कोतापूर यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.