*वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणे अनिवार्य-उत्तम जाधव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणे अनिवार्य-उत्तम जाधव*
*वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणे अनिवार्य-उत्तम जाधव*
नंदुरबार(प्रतिनीधी):-शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसवण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील सर्व वाहन मालकांनी दिनांक 31 मार्च, 2025 पर्यंत एचएसआरपी पोर्टलवर नोंदणी करुन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवावी असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक नोंदणी केल्यास वाहनांच्या नंबरप्लेटमध्ये होणारी छेडछाड आणि बनावटगिरी कमी होत असून रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत मोटार वाहनांसाठी, शासनाने अधिकृत केलेल्या उत्पादकांकडूनच एचएसआरपी बसवणे अनिवार्य असून HSRP पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करता येईल.
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट न बसल्यास, कार्यालयातील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, हस्तांतरण आणि इतर कामांसाठी येणाऱ्या सर्व वाहन धारकांकडून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकची नोंद केल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.