*विलवडे केंद्रातील चिमुकल्यांनी केले जिगरबाज खेळाचे प्रदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*विलवडे केंद्रातील चिमुकल्यांनी केले जिगरबाज खेळाचे प्रदर्शन*
*विलवडे केंद्रातील चिमुकल्यांनी केले जिगरबाज खेळाचे प्रदर्शन*
लांजा(प्रतीनिधी):-जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा बुधवार 8 जानेवारी 2025 रोजी सावर्डे चिपळूण येथे पार पडली शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये केंद्रस्तर, बीट स्तर तसेच तालुकास्तरावर अजिंक्यपद पटकावून विलवडे केंद्राच्या संघाने जिल्हास्तरावर झेप घेतली. या स्पर्धेत विलवडे केंद्रातील मोठा गट मुले खो- खो या प्रकारामध्ये जिल्हास्तरावर सहभाग नोंदवून अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. प्रथमदर्शनी छोटे छोटे दिसणारे खेळाडू पाहिल्यानंतर हे मोठ्या गटातील आहेत यावर कुणाचा विश्वासच बसेना. परंतु त्यांची चपळाई आणि खो -खो खेळातील कौशल्यचे प्रदर्शन पाहून उपस्थित प्रेक्षकांनी त्यांची वाहवा केली. मैदानात उतरल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने धावणारी मुले पाहून अनेक वेळा प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. उपशिक्षणाधिकारी शिरभाते यांनी अंतिम सामन्यासाठी क्रीडांगणात येऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अंतिम सामन्यात पोहोचून उपविजेते पद पटकावून लांजा तालुक्याचा सन्मान वाढवला. विलवडे केंद्रातील शाळा विलवडे नंबर 1, शाळा शिरवली नंबर 1 व शाळा वाघणगाव नंबर 1 या तीन दुर्गम भागातील शाळामधील विद्यार्थी यामध्ये सहभागी होते. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी बहुसंख्य पालक डेरवण या ठिकाणी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पर्शुराम मासये, नंदकुमार गोतावडे, चंद्रकांत कांबळे, प्रमोद कांबळे, दीपिका कांबळे, पुनम जाधव, उमेश केसरकर व श्रद्धा दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी ऋषभ नार्वेकर, सौरभ नार्वेकर व अमेय कानसे यांनी सरावासाठी विशेष मेहनत घेतली. दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी गावप्रमुख सुहास खामकर यांनी शाळेत येऊन बुके देऊन विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. गावातून तसेच पंचक्रोशीतून या चिमुकल्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पर्शुराम मासये यांनी शिक्षण प्रेमी ग्रामस्थ व सर्व पालकांचे मनापासून आभार मानले.