*पोलिस स्थापना दिनानिमित्त सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात किशोरवयीन मुलींसाठी व्याख्यान संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पोलिस स्थापना दिनानिमित्त सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात किशोरवयीन मुलींसाठी व्याख्यान संपन्न*
*पोलिस स्थापना दिनानिमित्त सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात किशोरवयीन मुलींसाठी व्याख्यान संपन्न*
मुंबई(प्रतिनीधी):-सोलापूर तालुका पोलीस ठाणे आयोजित किशोरवयीन मुलींसाठी जनजागृती पर व्याख्यान.
पोलीस स्थापना दिनानिमित्त आणि सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सोलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सोलापूर ग्रामीण भागात दहा व्याख्यानाचे आयोजन केले होते ज्यात 8 वी ते 12 वीतील तीन हजार मुलींनी सहभाग नोंदवला. मुंबईतील जाणीव जागृती चे व्याख्याते मिलिंद पोंक्षे आणि गौरी संखे यांनी ही व्याख्याने घेतली. त्यांनी आत्तापर्यंत 1025 व्याख्यानांचा टप्पा 19 जिल्ह्यात पार पाडला असून येथील व्याख्यानासाठी निर्भया पथकाच्या फरीदा शेख आणि त्यांचे सहाय्यक शिवाजी मोरे यांनी व्याख्यान यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले तसेच सोलापूर मध्ये वाढत चाललेले अपघात हे सांगण्यासाठी ट्रॅफिकचे लोखंडे, केंद्रे, आणि आकडे यांनी मुलींना विशेष मार्गदर्शन केले. फरीदा शेख यांनी निर्भया पथक करत असलेले कामगिरी आणि मुलींनी भीती न बाळगता आम्ही तक्रार कशी घेतो हे मुलींना समजवले तसेच त्यांना सर्व संपर्क नंबर देऊन शाश्वत केले. या व्याख्यानाचा फलित म्हणजे मुलींच्या मनातील भीती दूर झाली तसेच मुले बोलत्या झाल्या. बऱ्याच मुलींनी समोर येऊन आपली छोटी मोठी समस्या व्याख्यानानंतर निर्भीडपणे सांगितली जो या व्याख्यानाचा हेतू होता. हा कार्यक्रम सोलापूरचे एसपी यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.