*न्यू इंग्लिश स्कूल जैतापूरच्या कु. जय अनिल होळकरचे सुयश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*न्यू इंग्लिश स्कूल जैतापूरच्या कु. जय अनिल होळकरचे सुयश*
*न्यू इंग्लिश स्कूल जैतापूरच्या कु. जय अनिल होळकरचे
सुयश*
राजापूर(प्रतिनीधी):-जल्लोष 2024- 25अंतर्गत दिव्यांगांच्या रत्नागिरी जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा पोलीस परेड मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेचा शानदार शुभारंभ महाराष्ट्र शासनाचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार व जे पी जाधव गट विकास अधिकारी व समाज कल्याण अधिकारी रत्नागिरी उपस्थित होते. कु. जय अनिल होळकर हा न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूर या प्रशालेतील इयत्ता पाचवीत असून अंशतः अंध प्रवर्ग बुध्दिबळ स्पर्धा प्रथम क्रमांक व 25 मी. धावणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. जय यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राजश्री राजगौडा नारे व जैतापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त दिवाकर आडविरकर यांनी अभिनंदन केले आहे.