*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथील विद्यार्थ्यांची जैन इरिगेशन महोत्सवाला भेट*
![](https://jaymalharnews.com/upload/173677716618.jpg)
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथील विद्यार्थ्यांची जैन इरिगेशन महोत्सवाला भेट*
*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथील विद्यार्थ्यांची जैन इरिगेशन महोत्सवाला भेट*
नंदूरबार(प्रतिनीधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्रामार्फत कोळदा येथे मुक्त कृषि शिक्षण केंद्र सुरू आहे. मुक्त कृषि शिक्षण केंद्रात कृषि अधिष्ठान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, उद्यानविद्या व कृषि पत्रकारिता या शिक्षणक्रमांसाठी अभ्यासक्रम सुरु आहेत. दर वर्षी केंद्रातील विद्यार्थ्यांची अभ्यास सहलीचे आयोजन केले जाते. यावर्षी जैन इरिगेशन, जळगाव येथील जैन हाय-टेक कृषी महोत्सवाला नुकतेच अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले.
जैन इरिगेशन, कृषी महोत्सवात कांदा लागवड, टोमॉटो, नेट हाउस मधील तंत्रज्ञान फूलशेती, केळीच्या विविध जाती इल्लाकी, पुवन, नेन्द्रण, लाल केळी, बंथल व ग्रन्ड नैन, टिश्यू कल्चर प्लांटिंग मटेरियल पासून केळी, डाळिंब विषयी माहिती प्रयोगशाळेतील कार्य इत्यादीची माहिती जैन इरिगेशन येथील तज्ञांनी दिली.
तसेच अल्ट्राहायडेन्सिटी फळबागा, डाळिंब, चिकू जैन स्वीट ऑरेंज, हळदीच्या विविध जाती आटोंमेशन, ठिबक आणि स्प्रिंकलर पद्धती, सुक्ष्मसिंचनाचे विविध प्रकार, जैन ऑटोमेशन, स्मार्ट कृषी तंत्र, रोपे तयार करणे, लागवड प्रक्रिया, प्लास्टिक शीट, हरितगृह, जैव-खते, सौर उर्जा यासह वैविध्यपूर्ण उत्पादनांचा विकास, सोलर वॉटर हीटिंग सिस्टम, सोलर वॉटर पंप, टर्नकी बायोगॅस प्लांट, आणि ऊतक संवर्धन वनस्पती याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती घेऊन आपले चांगले सकारात्मक अभिप्राय दिले.
या अभ्यास सहलीच्या वेळेस डॉ. हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त धनराज कातोरे मुक्त कृषि शिक्षण केंद्राचे संयोजक पद्माकर कुंदे, तसेच शिक्षणकेंद्रातील प्राध्यापक जयंत उत्तरवार, उमेश पाटिल सौ. आरती देशमुख, डॉ. आदित्य देशपांडे, दुर्गाप्रसाद पाटिल, संदिप कुवर, किरण मराठे, कु. रेणुका कुलकर्णी व कृषि अधिष्ठान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, उद्यानविद्या व कृषि पत्रकारिता शिक्षणक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.