*नुतन विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज ओणीच्या 2003 ते 2004 मधील वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नुतन विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज ओणीच्या 2003 ते 2004 मधील वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन*
*नुतन विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज ओणीच्या 2003 ते 2004 मधील वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन*
विरार(प्रतिनीधी):-गतवर्षी 2023 ला तब्बल 20 वर्षानंतर एकत्रित येऊन स्नेह संमेलनाची प्रथमच सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता. त्याच जोश मध्ये व उत्साही वातावरणामध्ये याही वर्षी 1 डिसेंबर 2024 रोजी पाटील फार्म हाऊस विरार येथे स्नेहसंमेलन संपन्न झालं. स्नेह- संमेलनात वर्गातील स्वर्गीय मित्रांना आठवण म्हणून आदरांजली वाहून दिवसाची सुरुवात करण्यात आली. मुंबई स्थित व गावावरून आलेले आपले मित्र यांनी आपली मैत्री आणि अतूट नाते कसे असावे आणि ते कसे जपावे यावर प्रत्येक मित्र- मैत्रिणींनी आपल्या भावना व जुन्या आठवणीना उजाळा दिला. विविध, शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजक कार्यक्रम घेऊन प्रत्येक मित्र /मैत्रिणींना भेटवस्तू स्वरूपात बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. हे नुसते स्नेहसंमेलन नसून एक महोत्सव आहे या खुशीमध्ये प्रत्येक जण आनंदित न्हावून गेला होता. प्रत्येक मित्र-मैत्रिणीच्या सुख दुःखात अडचणीमध्ये सामील होऊन प्रत्येक आपला मित्र/ मैत्रीण मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी सर्व मित्रांनी संकल्प हाती घेतला.