*प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृध्दीसह योजनेचा लाभ घ्यावा-कि. ग. पाडवी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृध्दीसह योजनेचा लाभ घ्यावा-कि. ग. पाडवी*
*प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृध्दीसह योजनेचा लाभ घ्यावा-कि. ग. पाडवी*
नंदुरबार(प्रतिनीधी):-प्रधानमंत्री मत्स्यकिसान समृध्दीसह योजना ही प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेमधील केंद्रीय क्षेत्रातंर्गत सह योजना असुन ही योजना सन 2023 -24 ते 2026-27 या चार वर्षासाठी केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कि. ग. पाडवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या योजनेतंर्गत प्रथम टप्यात मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी निगडीत लाभार्थ्यांची राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंच (एनएफडीपी) अंतर्गत नोंदणी करावयाची आहे. यासाठी मच्छिमारांनी तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्राशी निगडीत कामगार मत्स्यविक्रेते, मत्स्यसवंर्धक, बीजनिर्मिते व्यापारी, मत्स्यखाद्य उत्पादक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नजीकच्या सामाईक सेवा केंद्रात जावुन आपली नोंदणी अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय यामध्ये करुन घ्यावी. या नोंदणीसाठी चालु स्थितीत बैंक खाते, आधार कार्ड, आधार कार्डाशी सलंग्न मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड आवश्यक राहील. या योजनेतंर्गत मत्स्यपालन/ मत्स्यसंवर्धन प्रकल्पांना योग्य संरक्षण विमा देणे अंतर्भुत आहे. 4 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जलक्षेत्रासाठी विमा खरेदी करु इच्छिणाऱ्या संवर्धकांना एकवेळ प्रोत्साहन देण्याची तरतुद असुन सदर प्रोत्साहन रक्कम प्रकल्पाच्या जलक्षेत्रासाठी रुपये 25 हजार प्रति हेक्टर मर्यादेच्या अधिन असलेल्या प्रिमीयम खर्चाच्या 40 टक्के इतकी असेल. कमाल देय प्रोत्साहन रकमेची मर्यादा 1 लाख व कमाल मत्स्यसंवर्धन क्षेत्र आकार 4 हेक्टर जलक्षेत्र इतकी असेल. या व्यतिरिक्त केज कल्चर रि-सर्कुलेटरी अक्वाकल्चर सिसटीम (आरएएस), बायोफ्लॉक या सारख्या प्रकल्पाच्या बाबतीत देय प्रिमियमच्या 40 टक्के इतके प्रोत्साहन एकवेळ दिले जाईल. या बाबतीत कमाल प्रोत्साहन रक्कम रुपये 1 लाख व प्रकल्पाच्या कमाल युनिट आकार 1800 घन.मि. असेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व महिला लाभार्थ्यांसाठी सामान्य श्रेणीसाठी देय असलेल्या प्रोत्साहनाच्या 10 टक्के अतिरिक्त प्रोत्साहन एकाच पीक चक्रासाठी दिले जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांला एनएफडीपी अंतर्गत नोंदणी करुन घेणे आवश्यक असून अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय प्लॉट नं. 17, 'परमात्मा' कामनाथ महादेव नगर, एस्सार पेट्रोल पंपच्या मागे, साक्री बायपास मार्ग, नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही पाडवी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.