*रत्नागिरीतील नमन कलावंतांचे 'महानमन', कोकण नमन कलामंचची निर्मिती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रत्नागिरीतील नमन कलावंतांचे 'महानमन', कोकण नमन कलामंचची निर्मिती*
*रत्नागिरीतील नमन कलावंतांचे 'महानमन', कोकण नमन कलामंचची निर्मिती*
रत्नागिरी(प्रतिनीधी):-गतवर्षी भरवलेल्या नमन महोत्सवाला भरघोस प्रतिसाद मिळाला होता अनेक स्थानिक कलाकारांना व्यासपीठही मिळाले होते. रत्नागिरी आणि परिसरात होणाऱ्या 'नमन खेळे' या लोककलेला उत्तम भविष्य आहे. येथील मंडळातील कलावंतांचे एकत्रित सहभाग असलेले महानमन लवकरच रसिकांपुढे आणले जाणार आहे. कोकण नमन कलामंचचे अध्यक्ष प्रभाकर उर्फ पी.टी. प्रभाकर कांबळे उपाध्यक्ष अरुण कळंबटे, संस्थापक अध्यक्ष श्रीधर खापरे, सुरेश होरंबे, विश्वनाथ गावडे, धनावडे, श्रीकांत बोंबले तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि सदस्य जंबो कार्यकारणी सदस्य आणि कलावंत उपस्थितीत महानमनाचा शुभारंभ करण्यात आला. या कलाकृतीसाठी सर्व पदाधिकारी व सदस्य मेहनत मेहनत घेत आहेत, कोकण ही भूमी कलेची, कलाकारांची आहेए या लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनपर भाष्य, काल्पनिक, पौराणिक एतिहासिक कथांच्या आधारे एक चित्तथरारक वगनाट्य सादर करत नमनाचा सांगावा केला जातो. यातून रंगभूमीची सेवा केली जाते या महानमन निर्मितीतून कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.