*के. आर. पब्लिक स्कुल, ज्यु. कॉलेज मध्ये आजी आजोबासाठी कार्यक्रम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के. आर. पब्लिक स्कुल, ज्यु. कॉलेज मध्ये आजी आजोबासाठी कार्यक्रम*
*के. आर. पब्लिक स्कुल, ज्यु. कॉलेज मध्ये आजी आजोबासाठी कार्यक्रम*
नंदुरबार(प्रतिनीधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल, ज्यु. कॉलेज नंदुरबार मध्ये नांतवा सोबत आजी- आजोबांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालक तर नेहमी शाळेच्या कार्यक्रमात उपस्थित राहतातच पण आजी- आजोबांसाठीचा कार्यक्रम हा आगळा वेगळा कार्यक्रम शाळेत संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नंदुरबार शहरातील उदयोजक सिध्दार्थ वाणी, सौ. उमाबेन वाणी, नंदुरबार जिल्हा पोलिस अधिक्षक, श्रवणदत्त, सौ. श्रबोनीपात्र, सिध्दार्थ वाणी, बळवंत जाधव हे उपस्थित होते. तसेच अनेक चिमुकले आपल्या आजी- आजोबा समवेत शाळेत उपस्थित होते. सर्व आज- आजोबांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्यासाठी नृत्य, संगीत, इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आजी-आजोबांनी नाती सोबत वाद्य वाजवीत भजन गाईले, आपले मनोगत व्यक्त केले, की खरच पहिल्यांदा त्यांना खुप वेगळेपणा वाटला व खुप मजा आली, मुलांमध्ये मुलं होऊन ते मनसोक्त आनंद घेत होते. शाळेचे चेअरमन किशोर वाणी यांनी आपल्या भाषणातुन सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व सर्व ग्रॅड पालकांचे स्वागत तथा आभार मानले.
शाळेच्या प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी हया कार्यक्रमात सर्व आजी-आजोबांचे आभार मानले. त्यांनी आपला अमुल्य वेळ त्यांच्या नांतवासाठी खर्च केला होता. ते म्हणाले की नातु- नात हे आजी- आजोबांची म्हातारपणाची काठी असते. ते त्यांचे मित्र असतात इत्यादी सांगत सर्वाचे कौतुक केले.