ताजा खबरे:
*गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविण्याकरिता परिचारिकांचे सक्षमीकरण आवश्यक-डॉ निलिमा सोनवणे*
*भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’-सनातन संस्था*
*पत्र सूचना कार्यालय (पीआयबी-PIB) फॅक्ट चेक अर्थात तथ्य पडताळणी विषयक माध्यमांसाठी माहिती*
*नंदुरबार येथे गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजने संदर्भात कार्यशाळा सपन्न*
*विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*श्री काशिनाथ बाबा मंदिरावर कार्तिक अमावस्येला झाले ध्वजारोहण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*श्री काशिनाथ बाबा मंदिरावर कार्तिक अमावस्येला झाले ध्वजारोहण*

  • Share:

*श्री काशिनाथ बाबा मंदिरावर कार्तिक अमावस्येला झाले ध्वजारोहण* 
नंदुरबार(प्रतिनिधी):-गवळी समाजासह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारे श्री काशिनाथ बाबा मंदिरावर शनिवार 30 नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्यानिमित्त ध्वजारोहण, होम हवन, पूजाअर्चा झाली. असंख्य भाविकांनी  महाप्रसादाचा लाभ घेतला. यंदा कार्तिक अमावस्या निमित्त शनिवार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेला बालवीर चौकातून वाजत गाजत ध्वज मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कलशधारी महिला सुहासिनींचा सहभाग होता. ध्वज मिरवणूक बालवीर चौकातून महात्मा बसवेश्वर नगर, दादा गणपती रोड, देसाईपुरा, मोठा मारुती मंदिर, धुळे नाका, वाघेश्वरी चौफुली, गोपाल नगरमार्गे ज्ञानदीप सोसायटीच्या टेकडीवरील श्री काशिनाथ बाबा मंदिरापर्यंत पोहोचली. त्यानंतर मंदिरावर  मानकरी काशिनाथ हिरणवाळे यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. होम हवन, पूजाअर्चा झाल्यानंतर महाप्रसाद भंडाऱ्याचा भाविकांनी दर्शनासह लाभ घेतला. धुळे रस्त्यावरील ज्ञानदीप सोसायटीच्या टेकडीवर श्री काशिनाथ बाबा यांचे मंदिर आहे. याच ठिकाणी श्री काशिनाथ बाबा यांची समाधी असून सोबत गणपती, बजरंगबली, महादेवाची पिंड, नंदी मूर्ती आहेत. सन 1970 मध्ये धुळे रस्त्यावरील टेकडीवर गुरे चारण्यास गेले असताना दृष्टांत झाला. जंगल सदृश्य टेकडी परिसरात श्री काशिनाथ बाबा मंदिराची प्रतिष्ठापना करण्याबाबत  तत्कालीन कुस्ती क्षेत्रातील वस्ताद कै. भिकाआप्पा गवळी  पहिलवान,कै. तुकाराम पहिलवान, तसेच कुस्तीगीर स्व. विठ्ठलआप्पा हिरणवाळे, निवृत्त शिक्षक जी.एस. गवळी बंधूंनी  स्वकष्टाने मंदिराची उभारणी केली. तब्बल 52 वर्षानंतर म्हणजे दोन वर्षांपूर्वी नंदुरबार नगर पालिकेतर्फे श्री काशिनाथ बाबा मंदिरावर भव्य हायमस्ट लाईट  बसविण्यात आला. यामुळे रात्रीच्या वेळी मंदिर परिसर लख्ख प्रकाशाने खुलून दिसतो. नवसाला पावणाऱ्या श्री काशिनाथ बाबा  मंदिराचे भक्तगण मोठ्या प्रमाणावर आहेत. शनिवारी झालेल्या कार्तिक अमावस्या उत्सवा निमित्त नंदुरबारसह धुळे, जळगाव, चोपडा, चाळीसगाव, मालेगाव, नगर, पुणे व राज्यातील भाविकांनी हजेरी लावली. श्री काशिनाथ बाबा मंदिर सेवा समिती तर्फे प्रतिवर्षी कार्तिक अमावस्येला मंदिराच्या वर्धापन दिन उत्सवानिमित्त खुल्या मैदानी कुस्ती स्पर्धा भरविण्यात येतात. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान येथील नामवंत मल्लांनी यापूर्वी हजेरी लावली आहे. विनामूल्य कुस्ती स्पर्धा भरवण्याची परंपरा कायम आहे. अशी माहिती श्री काशिनाथ बाबा सेवा समितीचे समन्वयक महादू हिरणवाळे यांनी दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा पुरविण्याकरिता परिचारिकांचे सक्षमीकरण आवश्यक-डॉ निलिमा सोनवणे*
May, 09 2025
*भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’-सनातन संस्था*
May, 09 2025
*पत्र सूचना कार्यालय (पीआयबी-PIB) फॅक्ट चेक अर्थात तथ्य पडताळणी विषयक माध्यमांसाठी माहिती*
May, 09 2025
*नंदुरबार येथे गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजने संदर्भात कार्यशाळा सपन्न*
May, 09 2025
*विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम*
May, 09 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज