*नंदुरबार ईदगाह मैदान14 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 पावेतो गोळीबार सराव दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात/परिसरात नागरिकांनी फिरू नये, गुरे चारणारे गुराखी यांनी या भागात फिरू नये*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार ईदगाह मैदान14 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 पावेतो गोळीबार सराव दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात/परिसरात नागरिकांनी फिरू नये, गुरे चारणारे गुराखी यांनी या भागात फिरू नये*
*नंदुरबार ईदगाह मैदान14 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 पावेतो गोळीबार सराव दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात/परिसरात नागरिकांनी फिरू नये, गुरे चारणारे गुराखी यांनी या भागात फिरू नये*
नंदूरबार(प्रतिनीधी):-केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल यांचा सन 2024-25 चे वार्षिक गोळीबार सराव दि. 30 नोव्हेंबर 2024 ते दि.1 डिसेंबर 2024 तसेच दि.14 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत नंदुरबार शहरातील बिलाडी रोड, ईदगाह मैदानाजवळ, नंदुरबार येथे घेण्याबाबत जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी परवानगी दिली आहे. त्याअन्वये सदर प्रतिबंधित क्षेत्रात दि. 30 नोव्हेंबर 2024 ते दि. 29 डिसेंबर 2024 तसेच दि. 14 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीत गोळीबार सराव दरम्यान औद्योगिक सुरक्षा बल अधिकारी व अंमलदार तसेच प्रशिक्षक यांचे व्यतिरिक्त कोणासही प्रवेश करण्यास मनाई आदेश जारी केलेला आहे. तरी नंदुरबार जिल्हा व ईदगाह मैदानाजवळील भागातील नागरिकांना सूचित करण्यात येते की, दि.30 नोव्हेंबर 2024 ते दि.1 डिसेंबर 2024 तसेच दि. 14 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 पावेतो गोळीबार सराव दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात/परिसरात नागरिकांनी फिरू नये, गुरे चारणारे गुराखी यांनी देखील या भागात येऊ नये, तसेच जिल्हाधिकारी, नंदुरबार यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचे पालन करावे व जिल्हा पोलीस दलास सहकार्य करावे. असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.