*मोडी दर्पण दिवाळी अंकाचे मान्यवरांच्या हस्ते शानदार प्रकाशन*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मोडी दर्पण दिवाळी अंकाचे मान्यवरांच्या हस्ते शानदार प्रकाशन*
*मोडी दर्पण दिवाळी अंकाचे मान्यवरांच्या हस्ते शानदार प्रकाशन*
पवई(प्रतिनीधी):-शिवकालीन मोडी लिपीच्या प्रसारार्थ असलेला पण मराठी भाषेतीलही वाचकांनाही खुमासदार मेजवानी देणारा मोडी दर पण दिवाळी अंक मुंबई येथील पवई हायस्कूल मध्ये दिमाखदार सोहळ्यात प्रकाशित झाला. ज्येष्ठ कवी व व्याख्याते प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन होताना ज्येष्ठ चित्रकार कवी लेखक विजयराज बोधनकर, सुप्रसिद्ध उद्योजक मधुकर गोमणे, बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी के आर कंदी व मोडी दर्पणचे संपादक सुभाष लाड हे व्यासपीठावर होते.
मोडी लिपीला संगणकीय रूपात आणून नव्या पिढीला नव्या स्वरूपात मोडी लिपीची ओळख करून देणारे कोल्हापूरचे नवीन कुमार माळी यांना मोडी लिपी मित्र मंडळातर्फे' मोडीरत्न' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोडी दर्पण तर्फे आयोजित केलेल्या ग्रामीण कथा स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. आपल्या विनोदी ढंगाने कवितांची पखरण करीत प्रसाद कुलकर्णी यांनी मोडी दर्पणने आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे याचे कौतुक केले. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने त्याचे कौतुक करताना आपण आपल्या पिढी जात मराठीने केलेल्या कामगिरीला तितकेच मोलाचे स्थान आहे याचे भान आपल्याला जपायला हवे असे सांगताना मोडी दर पडणे या दिवाळी अंकात कोकणातील बोलीभाषांचा परिचय करून देण्याचं काम केल्याने हा अंक संग्रही ठेवण्यासारखा झाला आहे हेही त्यांनी नमूद केले. याच व्यासपीठावर विजयराज बोधनकर यांच्या हस्ते रत्नागिरीतील संपादक प्रमोद कोनकरांच्या 'कोकण मीडिया' या दिवाळी अंकाचेही प्रकाशन झाले. यावेळी विजयराज बोधनकर डॉक्टर मंगेश हांदे, के.आर. कंदी, मधुकर गोमणे यांनी शुभेच्छा दिल्या. सुभाष लाड यांनी मोडी लिपीच्या प्रसार कार्यासाठी समाजातील मोडी अभ्यासक जसे झटून काम करत आहेत तसेच या कामी अनेक दाते सुद्धा मोकळ्या मनाने आर्थिक योगदान देत आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले. अनेक क्रियाशील कार्यकर्ते जोडले गेल्याने गेली पंधरा वर्षे सातत्याने मोडी दर्पण प्रकाशित होतो आहे याचा आपणास अभिमान असल्याचे त्यांनी व्यक्त केले. मोडी दर्पणचे सहसंपादक मोडी अभ्यासक सुनील कदम, प्रकाश हरचेकर, गणेश चव्हाण, प्रमोद पवार, विजय बाराथे, गणेश साळुंखे, प्रमोद मेस्त्री, सुरेश पेडणेकर, तेजस तावडे योगेश पेडणेकर ॲड. निकिता लाड, मिलिंद कोटकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे दीपक नागवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शनाचे काम महेंद्र साळवी यांनी केले.