*हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी व रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी हिंदू जनजागृती समिती व हिंदुत्ववादी यांच्या मदतीने सामूहिक शस्त्र पूजन करण्यात आले*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी व रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी हिंदू जनजागृती समिती व हिंदुत्ववादी यांच्या मदतीने सामूहिक शस्त्र पूजन करण्यात आले*
*हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी व रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी हिंदू जनजागृती समिती व हिंदुत्ववादी यांच्या मदतीने सामूहिक शस्त्र पूजन करण्यात आले*
नंदुरबार(प्रतिनीधी):-विजयादशमीच्या निमित्ताने शस्त्र पुजनाच्या माध्यमातून हिंदू मधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्यासाठी बळ मिळावे यासाठी हिंदू जनजागृती समिती व समविचारी हिंदुत्ववादी यांच्या वतीने श्रीमोठा मारुती मंदिर येथे सामूहिक शस्त्र पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभ हा मंत्रोपचाराने करण्यात आला, मोठा मारुती मंदिराचे पुजारी विलास जोशी यांनी मंत्र पठण करून मान्यवर श्रीमोठा मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक चौधरी, सचिव कल्याण पाटील, सैन्य दलातील मेजर अरविंद निकम, तसेच राष्ट्रीय स्वयं संघाचे राजेश गिरनार, यांच्या हस्ते संपन्न झाले,
यावेळी हिंदू सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे नरेंद्र तांबोळी, देवा कासार, दिग्विजय ठाकरे, व मनसेचे युवाअध्यक्ष कुमारी आश्लेषा पवार व विविध संघटनांचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते,
‘यावेळी दुर्गा देवीचा नाम जप आरती करून ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र मराठे यांनी केले तसेच आकाश गावित, योगेश चौधरी, हर्षल देसाई, राहुल मराठे व सुमित परदेशी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी परिश्रम घेतले.