*ईद निमित्ताने नंदुरबार शहरातून काढण्यात आलेल्या धार्मिक जुलूस दरम्यान दगडफेक, पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ईद निमित्ताने नंदुरबार शहरातून काढण्यात आलेल्या धार्मिक जुलूस दरम्यान दगडफेक, पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात*
*ईद निमित्ताने नंदुरबार शहरातून काढण्यात आलेल्या धार्मिक जुलूस दरम्यान दगडफेक, पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात*
नंदुरबार(प्रतिनिधी)-ईद निमित्ताने नंदुरबार शहरातून काढण्यात आलेल्या धार्मिक जुलूस दरम्यान आज दगडफेकीची घटना घडली आहे. दोन गटात झालेल्या या तुफान दगडफेकीनंतर उपद्रव्यांनी शहरातील माळीवाडा, रामरहीम चौकी, काळी मस्जिद, भद्रा चौक, नवनाथ टेकडी भागात तोडफोड आणि जाळपोळ करत उपद्रव माजवण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी तात्काळ कार्यवाही करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत परिस्थीती नियंत्रण मिळवला आहे. शहरात सध्या तणावपुर्ण शांतता असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैणात केला आहे. तर इतर शहरातून अतिरीक्त पोलीसांची कुमक देखील मागवण्यात आली. नंदुरबार शहरातून आज ईद निमित्ताने एका समाजाने धार्मिक रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीचे पहिले टोक शहरातील जळका बाजार परिसरात पोहचल्यानंतर दुसरीकडे रॅलीच्या शेवटचे भाग असलेल्या माळीवाडा परिसरात अचानक दगडफेक आणि अफरातफरी सुरु झाली. यानंतर उपद्रव्यानी शहरातील अनेक भागात दगडफेक करुन जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला. या रॅलीसाठी पोलीसांनी आधी चांगलाच पोलीस बंदोबस्त तैणात केला होता. त्यामुळ उपद्रव्यांचा उद्रेक होताच पोलीसही तातडीने हरकत मध्ये आले.
उपद्रव्यांच्या या दगडफेकीत माळीवाडा , भद्राचौक, काळीमस्जिद भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेक दुचाकी गांड्याची तोडफोड झाली आहे. तर चार घरांना जाळण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. उपद्रव्यानी दस्तुरखुद्द पोलीस अधिक्षकांसह एका पोलीस वाहनांच्या काचा फोडल्या आहेत. तर नवनाथ नगर टेकडी भागत दोन घरांच्या जाळपोळीसह दोन सिलेंडरला देखील आग लावण्याचा प्रयत्न झाला आहे. दोन पोलीस कर्मचारी वगळता सुदैवाने या दंगलीत सामान्य नागरीक जखमी होण्याची वार्ता नाही. दरम्यान या घटनेतील आरोपींना कुठल्याही प्रकारे सोडल्या जाणार नाही. तर शहरातील परिस्थीती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवणदत्त एस यांनी केले आहे. तसेच सोशल मिडीयावरुन कुठल्या प्रकारचे आपत्तीजणक अथवा नागरीकांचे माथे भडकवणारे व्हीडीओ प्रसारीत केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाईचे सज्जड इशारा पोलीस अधिक्षकांनी दिला आहे. या घटनेच्या पार्श्वभुमीवर इतर ठिकाणाहून अतिरीक्त पोलीस बंदोबस्त देखील तैणात करण्यात आला आहे.