*शिवसेना नेते,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुरावा, नंदुरबारात आता 1 दिवसाआड पाणीपुरवठा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शिवसेना नेते,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुरावा, नंदुरबारात आता 1 दिवसाआड पाणीपुरवठा*
*शिवसेना नेते,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पाठपुरावा, नंदुरबारात आता 1 दिवसाआड पाणीपुरवठा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-यंदा अपेक्षेप्रमाणे भरपूर पर्जन्यवृष्टी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिकेच्या प्रशासकांकडे शहराला पूर्ववत 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 25 सप्टेंबर पासून पूर्ववत 1 दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मागणीला यश आले असून, शहरात 25 सप्टेंबर पासून पूर्ववत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कमी पर्जन्यमानाचामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती त्याचप्रमाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक मध्यम प्रकल्पात देखील अल्प पाणीसाठा असल्यामुळे प्रथम 2 दिवसाआड त्यानंतर तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येत होता.
यंदा वरुण राजा मेहरबान झाल्याने नंदुरबार शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक मध्यम प्रकल्पात देखील मुबलक पाणी साठा असल्यामुळे 25 सप्टेंबर पासून 1 दिवसाआड शहरवासीयांना पाणी उपलब्ध होणार आहे.