*आष्टा येथील स्वातंत्र्यसैनिक स्व. गुंडेराव माधव अलट यांच्या स्मृतीपित्यार्थ गुणवंतांचा सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आष्टा येथील स्वातंत्र्यसैनिक स्व. गुंडेराव माधव अलट यांच्या स्मृतीपित्यार्थ गुणवंतांचा सत्कार*
*आष्टा येथील स्वातंत्र्यसैनिक स्व. गुंडेराव माधव अलट यांच्या स्मृतीपित्यार्थ गुणवंतांचा सत्कार* आष्टा(प्रतिनीधी):-मराठवाडा मुक्ती साठी त्याग आणि बलिदान केलेल्या, हौतात्म्य पत्करलेल्या कारावास भोगलेल्या महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला परंतु आपल्या देशातील काही संस्थाने अशी होती की ती स्वतंत्र भारतामध्ये सामील होण्यास नकार देत होते त्यांना त्यांचं वेगळं राष्ट्र निर्माण करायचं होतं धार्मिक द्वेषाने काही लोक पछाडले होते. त्यादरम्यान हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याचे नेतृत्व हिंदू युनियनचे स्वामी रामानंद तीर्थ हे करत होते तसेच त्यांच्यासोबतच मराठवाड्यातील गावागावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने प्रेरित होऊन लढ्यामध्ये सामील होत होता त्यामधीलच कौळखेडचे आप्पाराव पाटील, चाकूरचे देविदास जोशी, बाबासाहेब परांजपे ही मंडळी आघाडीवर होती. त्यांच्यासोबतच आष्टा गावातील स्वातंत्र्य सैनिक अगदी तरुण वयापासून ज्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवून या मातीच्या स्वतंत्र्यासाठी लढा दिला, आपल्या मराठवाड्यातील हिंदू युनियन मधील नेतृत्व करत असलेल्या नेत्यांना दारूगोळा पुरवणे बंदुका पुरवणे तसेच निजामांच्या धान्याच्या वखारी लुटून इतर गरीब लोकांना त्याचे वाटप करणे. सशस्त्र क्रांती करत असताना त्यांना दोन वर्ष सेंट्रल जेल ऑफ बिदर मध्ये शिक्षा झाली. त्यादरम्यानच भारताचे लोहपुरुष त्यावेळचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी हैदराबाद, जुनागड, जम्मू-काश्मीर ही संस्थाने खालसा करण्याचा चंग बांधला आणि दिल्ली मधून सोलापूर मार्गे सैन्य दारुगोळा पाठवून निजामाचा तसेच रझाकारी लोकांचा बंदोबस्त केला त्याला त्यावेळच्या भाषेत "पोलीस ॲक्शन " असे म्हणतात निजाम शरण आला. रजाकारी लोक पाय लावून पाकिस्तानला पळून गेले. आणि आपला मराठवाडा निजामाच्या रझाकाराच्या गुलामगिरीतून, जुलमी राजवटीतून कायमचा मुक्त झाला. देश हमे देता है सब कुछ! हम भी तो कुछ देना सीखे! समाजसेवा हीच ईश्वर सेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, अन्याय आत्याचाराविरुद्ध लढा दिला, रयतेला सुखी करण्यासाठी आपला आयुष्य खर्ची घातलं आपल्या मातीचं रक्षण केलं आणि तुमच्या आमच्यासाठी हा सोन्याचा दिवस उगवला. या ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या आष्टा गावाला देखील धैर्य, शौर्य, वीरत्व या गोष्टींची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे शहीद उत्तम बिराजदार, हुतात्मा हनुमंत गायकवाड तसेच आष्टा गावातील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्व. गुंडेराव माधवराव अलट (हैदराबाद मुक्तिसंग्राम 1945 -47 ) त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागच्या वर्षी पासुन आपल्या गावातील गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा करण्याचा निश्चय आपल्या गावचे शिक्षक तुकाराम गुंडेराव अलट यांनी केला आणि त्याच धर्तीवर 17 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा जिल्हा परिषद केंद्र शाळा आष्टा, भगतसिंग विद्यालय आष्टा तसेच आर .पी. भंडारी प्राथमिक विद्यालय आष्टा येथील गुणवंत मुलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या दरम्यान गावातील सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ, तसेच त्यांचे गावातील नातेवाईक,सर्व लहान थोर मित्र मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांचे त्यांनी मनापासून आभार मानले. सदर कार्यक्रम आयोजित करुन तरुण पिढी साठी नवा आदर्श निर्माण केला म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक तुकाराम गुंडेराव अलट यांचे आष्टा गावाचे सरपंच सावता माळी यांनी मनोगत व्यक्त करून आभार व्यक्त केले.