*राज्यस्तरीय एरियल सिल्क स्पर्धेत महेंद्रा पब्लिक स्कूलच्या चार विद्यार्थ्यांचे सुयश व राष्ट्रीय स्तरावर निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यस्तरीय एरियल सिल्क स्पर्धेत महेंद्रा पब्लिक स्कूलच्या चार विद्यार्थ्यांचे सुयश व राष्ट्रीय स्तरावर निवड*
*राज्यस्तरीय एरियल सिल्क स्पर्धेत महेंद्रा पब्लिक स्कूलच्या चार विद्यार्थ्यांचे सुयश व राष्ट्रीय स्तरावर निवड*
नंदुरबार(प्रतिनीधी):-एरिअल स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र व एरिअल स्पोर्ट्स असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने, नाशिक येथे एरिअल सिल्क स्पर्था घेण्यात आल्या.
यामध्ये नंदुरबार येथील महेंद्रा पब्लिक स्कूलच्या जेसिका गणेश पाटील, संस्कार ओम गोस्वामी, याचना धर्मेंद्र पाडवी, पलक चेतन जैन, हितीका चेतन जैन, विहान जयेश जैन, ममता मानाराम चौधरी या सात विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेत राज्यस्तरावरून अनेक विद्यार्थांनी सहभाग घेतला होता. महेंद्र पब्लिक स्कूलचे पलक चेतन जैन, विहान जयेश जैन, ममता मानाराम चौधरी, हितीका चेतन जैन या चार हि विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली. पुढील राष्ट्रीयस्तरावरील सामने जयपूर येथे खेळले जाणार आहेत, सदर विजयी खेळाडूंचे शाळेचे चेअरमन केतन शहा, शाळेच्या संचालिका पिनल शहा, प्राचार्य अरुण पाटील व समन्वयिका सुचेता वसावे यांनी कौतुक केलें व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.