*एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिवस संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिवस संपन्न*
*एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिवस संपन्न*
नंदूरबार(प्रतिनीधी):-एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात 14 सप्टेंबर राष्ट्रभाषा हिंदी दिवस उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. के. चौधरी होते. कार्यक्रमातील मान्यवर मिलिंद वडनगरे, श्रीमती वर्षा घासकडबी, श्रीमती सुवर्णा गिरासे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील हिंदी विषय शिक्षक अन्सार शेख यांनी केले. महाविद्यालयातील इयत्ता अकरावी (विज्ञान-अ) च्या विद्यार्थिनी कु. एकता गायकवाड, कु. दर्शना गावीत, कु. कंचन नाईक आपल्या मनोगतातून हिंदी राष्ट्रभाषेचे महत्त्व, राष्ट्रभाषेचा इतिहास आणि राष्ट्रभाषेचे सांस्कृतिक महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रमुख वक्ते महेंद्र गिरासे यांनी हिंदी भाषेचे वाढते महत्त्व, हिंदी भाषेत रोजगाराच्या संधी, स्वातंत्र लढ्यातील हिंदी भाषेचे योगदान इ. विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व मांन्यवरांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.