*आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांची बैठक संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांची बैठक संपन्न*
*आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांची बैठक संपन्न*
अक्कलकुवा(प्रतिनीधी):-अक्कलकुवा येथील महाकाली माता मंदिराच्या सभागृहात विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांची बैठक संपन्न झाली, यावेळी ग्राम रोजगार सेवक यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देऊन आमदार आमश्या पाडवी यांना ग्राम रोजगार सेवक यांनी पाठिंबा दिला असून, त्या संदर्भात लेखी पाठिंबा पत्र दिले,
यावेळी नंदुरबार जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कान्हा नाईक, मगन वसावे, वसंत वसावे, जी. डी.पाडवी, दिनेश वसावे, जिल्हा ग्राम रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष रुपसिंग चौधरी, उपाध्यक्ष कृष्णा ठाकरे, सुभाष पाडवी, सचिव सखाराम राऊत, राजु पाटील, राजु तडवी, हुजेफा बलोच, रविंद्र गुरव, अविनाश बि-हाडे तसेच जिल्हा भरातील ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते यावेळी ग्राम रोजगार सेवक यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना देण्यात आले. ग्राम रोजगार सेवकांना मार्गदर्शन करतांना आमदार आमश्या पाडवी यांनी सांगितले की, मी रोजगार सेवक हा ग्रामीण विकासाचा कणा असून आपण संघटित रहा, आपल्या सर्व मागण्या मी शासनाकडून मंजूर करुन देईल तसेच यापुढे हि आपल्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध राहिल असे सांगितले. यावेळी जिल्हा अध्यक्ष रुपसिंग चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष पाडवी यांनी तर सुत्रसंचालन अमरसिंग वसावे यांनी केले. आभार अशोक वळवी यांनी मानलेत.