*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे पर्यावरणपूरक गणराज ठरले लक्षवेधी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे पर्यावरणपूरक गणराज ठरले लक्षवेधी*
*शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे पर्यावरणपूरक गणराज ठरले लक्षवेधी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील बालवीर चौक परिसरातील शहीद शिरीष कुमार मित्र मंडळा तर्फे यंदाहि गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणपूरक शाडू मातीचे गणराज स्थापित करण्यात आले आहेत. नंदनगरीचे श्रीमंत दादा गणपती यांची प्रतिकृती यंदा मंडळातर्फे साकारण्यात आली आहे. याशिवाय सुबक आणि देखणी गणरायाची मूर्ती नैसर्गिक कुटियामध्ये विराजमान करण्यात आली आहे. शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे यंदा गणेशोत्सवाचे 35 वे वर्ष आहे. ढोल, ताशे, गुलाल रहित गणेशोत्सवाची परंपरा कायम आहे. दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांची रेलचल कायम असते. रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, मोफत तुळशी रोप वाटप, दंत तपासणी शिबिर, रक्तगट तपासणी शिबिर आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे आणि ज्येष्ठ सल्लागार जी. एस. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम सुरू आहेत. मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमात उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक यादबोले, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सुदाम गवळी, नितीन पाटील, गोपाल हिरणवाळे, काशिनाथ गवळी, विशाल हिरणवाळे आदी परिश्रम घेत आहेत.