*गणेश विसर्जनासाठी गेलेल्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू जिल्हा रुग्णालयासमोरील तलावातील घटना*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गणेश विसर्जनासाठी गेलेल्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू जिल्हा रुग्णालयासमोरील तलावातील घटना*
*गणेश विसर्जनासाठी गेलेल्या बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू
जिल्हा रुग्णालयासमोरील तलावातील घटना*
नंदुरबार(प्रतिनीधी):- नवव्या दिवशी काल गणेश विसर्जनासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयासमोरील तळ्यात गणपती विसर्जन करत असतांना अचानक पाण्याने भरलेल्या चारीचा कडा तुटल्याने 15 वर्षीय बालक त्यात कोसळल्याने त्याचा दुर्देवी अंत झाला. या घटनेने कुटूंबियांवर शोककळा पसरली आहे. हर्षल हनुमंत पाटील रा. हनुमानखेडा ता. पारोळा जि. जळगाव) असे मृत बालकाचे नाव आहे.
15 रोजी गणपती विसर्जनाचा नववा दिवस होता. हर्षल पाटील हा आपल्या नातेवाईकांसोबत गणपती विसर्जनासाठी गेला होता. नंदुरबार जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या तळ्यात ते गणपती विसर्जन करत होते. यावेळी तळ्याच्या काठावर असतांना अचानक चारीचा कडा तुटला. यामुळे हर्षल पाटील हा पाण्यात कोसळला. त्याला वाचविण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी तसेच नातेवाईकांनी देखील पाण्यात उडी घेतली. मात्र हर्षल आढळून आला नाही. काही वेळाने त्याचा मृतदेह आढळून आला. नागरिकांच्या मदतीने त्यास बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉ.परवीन सांगवीकर यांनी त्याची तपासणी करुन मयत घोषित केले. याबाबत आष्टे येथील श्रीराम आनंदा पाटील यांच्या खबरीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ.विनायक सोनवणे करीत आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मृत हर्षल पाटील याच्यावर शवविच्छेदन करुन त्याचा मृतदेह सायंकाळी उशिराने त्याच्या हनुमानखेडा या मुळ गावी नेण्यात आला. हर्षल हा शिक्षणासाठी आत्याकडे आला होता. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.