*श्रीमती विमल बटेसिंग रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात प्रवेशाचे आवाहन, केलं वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीमती विमल बटेसिंग रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात प्रवेशाचे आवाहन, केलं वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी*
*श्रीमती विमल बटेसिंग रघुवंशी नर्सिंग महाविद्यालयात प्रवेशाचे आवाहन, केलं वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका विधायक समितीत नर्सिंग महाविद्यालयाला नुकतीच मंजुरी मिळालेली आहे. या शैक्षणिक वर्षापासून शासकीय कोट्यातून 100 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असून, इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. नंदुरबार तालुका विधायक समितीने जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात गेल्या 50 ते 60 वर्षांपासून विविध शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्थेतील अनेक विद्यार्थी मोठ्या हुद्द्यांवर कार्य करीत आहेत. दरम्यान, शासनाने संस्थेला नर्सिंग बीएससी महाविद्यालयाची नुकतीच मंजुरी दिलेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संधी असून, शासकीय कोट्यातून 100 पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
सीईटी, नीट उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंगसाठी प्रवेश मिळणार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुकांनी श्रीमती विमलताई बटेसिंग रघुवंशी नर्सिंग महाविद्यालय, खोडाई माता रोड, जी.टी.पी महाविद्यालय जवळ, यशवंत महाविद्यालयाच्या शेजारी, नंदुरबार येथे संपर्क साधावा. संपर्कासाठी 9823774622, 9420560954 देण्यात आला आहे. नंदुरबार तालुका विधायक समितीच्या अनेक शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून जिल्हाभरातील त्याचप्रमाणे जिल्हा बाहेरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आजपर्यंत संस्थेने विद्यार्थी हित लक्षात घेत अनेक योजना राबवल्या. जिल्ह्यातील रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी वैद्यकीय क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेने शासनाकडे पाठपुरावा केला असता नर्सिंग महाविद्यालय मंजूर झाले आहे. श्रीमती विमलताई बटेसिंग रघुवंशी असे महाविद्यालयाला नाव देण्यात आले आहे असे चंद्रकांत रघुवंशी, चेअरमन- नंदुरबार तालुका विधायक समिती यांनी सांगितले आहे.