*पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी जनजागृती, शाडूमातीच्या गणेशमुर्ती विक्री शुभारंभ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी जनजागृती, शाडूमातीच्या गणेशमुर्ती विक्री शुभारंभ*
*पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठी जनजागृती, शाडूमातीच्या गणेशमुर्ती विक्री शुभारंभ*
नंदुरबार(प्रतिनिधि):-गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. बाजारपेठेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्त्यांमुळे प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे नागरीकांनी शाडू मातीच्या गणेश मुर्तींची स्थापना करुन पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी जनजागृती करण्याचे आवाहन मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भदाने यांनी केले. श्रीगणेश कला केंद्राच्या प्रथम गणेश मुर्तीचे वितरण आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू कु. नारायणी मराठे हिच्या हस्ते पुरोहित विपुल कुलकर्णी महाराज यांना करण्यात आले.
श्रीगणेश कला केंद्राच्या वतीने दुकान क्रमांक 10, जुनी नगरपालिका कॉम्प्लेक्स, मेन रोड याठिकाणी शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाडू मातीच्या श्रीगणेश कला केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उद्योगपती नितेश अग्रवाल, उद्योगपती रवी जैन, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू कु.नारायणी मराठे, माजी नगरसेवक आणि नंदुरबार नगरपालिकाचे विरोधी पक्ष नेते चारुदत्त कळवणकर, हिंदु जनजागृती समितीचे नंदुरबार जिल्हा समन्वयक सतीष बागुल, आदर्श विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी भदाने आणि केंद्रप्रमुख पंकज भदाणे, डॉ. उपेंद्र शाह आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, केंद्रप्रमुख पंकज भदाने यांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि श्रीगणेशाची आरती करून पर्यावरणपूरक आणि धर्मशास्त्रानुसार सुसंगत अशा शाडूमातीच्या श्री गणेशमुर्त्यांचे वितरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान मुख्याध्यापिका म्हणाले की, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींमुळे पाण्याचे प्रदुषण होत असल्याने प्रशासनावर ताण येतो, शाडू मातीच्या पर्यावरण पुरक मुर्त्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास प्रशासनाच्या भार हलका होऊ शकतो. तसेच पर्यावरणपुरक उपक्रमांना विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. दरम्यान पर्यावरणपूरक आणि धर्मशास्त्रानुसार बनवलेल्या श्री गणेशमुर्त्यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच शाडूमातीपासून तयार केल्या जाणाऱ्या गणेशमुर्तीचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून असे उपक्रम प्रत्येकाने राबविले पाहीजे. तसेच त्याचा प्रसार देखील करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले. हिंदु जनजागृती समितीचे नंदुरबार जिल्हा समन्वयक सतीष बागुल आपल्या मनोगतात म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरु केला त्या उद्देशाला धरून प्रत्येक मंडळांनी आदर्श कृती आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविले तर खऱ्या अर्थाने आदर्श गणेशोत्सव साजरा होऊन श्री गणेशाची कृपा देखिल आपल्या सर्वांवर होईल. शहरातील सर्व गणेशमंडळांनी सार्वजनिक गणेश मंडळात मोठमोठ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्रीगणेश मूर्तींची स्थापना करण्या ऐवजी शाडू मातीच्या लहान गणेश मूर्तींची स्थापना करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच अनेक मंडळांकडून देखील यंदा शाहूमातीच्या मूर्तींची स्थापना केली जाणार असल्याचे बागुल यांनी सांगीतले.
राहुल मराठे श्रीगणेश कला केंद्र,नंदुरबार ७७७५०९९४६७