*महिला सक्षमीकरण केंद्र योजनेत 100 दिवस जनजागृती अभियान-ज्योती पाठक*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महिला सक्षमीकरण केंद्र योजनेत 100 दिवस जनजागृती अभियान-ज्योती पाठक*
*महिला सक्षमीकरण केंद्र योजनेत 100 दिवस जनजागृती अभियान-ज्योती पाठक*
नंदुरबार(प्रतिनीधी):-महिला व बाल विकास विभागामार्फत सुरू असलेल्या वन स्टाप सेंटरच्यावतीने महिला सक्षमीकरण केंद्र या योजनेत 100 दिवस जनजागृतीचे अभियान जिल्ह्यात विविध ठिकाणी घेण्यात येत असल्याची माहिती वन स्टाप सेंटरच्या केंद्र व्यवस्थापक ज्योती पाठक यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्यूये दिली आहे. सदर अभियान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी तसेच जिल्हा संरक्षण अधिकारी रविंद्र काकळीज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून 21 जून 2024 पासून ते 4 ऑक्टोंबर 2024 पर्यंत च्या शंभर दिवसात जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, आदि विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे. या अभियानात
जनजागृती शिबीर मोहिम, सार्वजनिक संवाद, कार्यशाळा, चर्चासत्रे व मोहिमांद्वारे अभियानाची माहिती, वन स्ट्रॉप
सेंटर, महिला हेल्प लाईन 181 अंतर्गत देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती आदि महिलांना देण्यात येणार आहे. अभियान कार्यक्रम जिल्ह्यात आतापर्यंत नर्सिंग कॉलेज, जिल्हा शासकिय रुग्णालय, तळोदा तालुक्यातील बोरद,
प्रतापपुर, व नंदुरबार तालुक्यातील ढेकवद, नटावद, दुधाळे, भांगडा, पावला, सुंदर्दा याठिकाणी घेण्यात आला. कार्यक्रमास नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी, पारिचारिका, अंगणवाडी सेविका, आशा, सरपंच, बचत गटातील महिला आदि उपस्थित होते.