ताजा खबरे:
*एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा*
*वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शैक्षणिक सहल संपन्न*
*परप्रांतीय लोंढे थांबवणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाचल ग्रामपंचायतीला निवेदन*
*जावडे प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप, कर्मचारी कमतरतेचे कारण पुढे,‌ 24 तास डॉक्टर आणि रिक्त पदे भरण्याची प्रितेश पवार यांची मागणी*
*महाराष्ट्र अंनिसवर समाज परिवर्तनाची महत्त्वाची जबाबदारी-नीरजा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा*

  • Share:

*एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि सर्वधर्मसमभावाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. नूतनवर्षा राजेश वळवी होत्या, तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील विधीज्ञ तथा मुख्य लोक अभिरक्षक (Chief Legal Aid Counsel) ऍड. सीमा खत्री उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख अतिथी एडव्होकेट सीमा खत्री यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधान दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. भारतीय संविधानाची निर्मिती, संविधान सभेचे कार्य, संविधानातील मूलभूत तत्त्वे, नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये यांविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेने जगण्याचा अधिकार देणारा आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकार करावा, सामाजिक सलोखा जपावा आणि जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन व उद्बोधन झाले. याचबरोबर विद्यार्थ्यांची संबंधित अतिशय संवेदनशील असा बॉक्स कायदा व सायबर क्राईम याविषयी सुद्धा सखोल असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयाच्या प्राचार्या सौ. नूतनवर्षा राजेश वळवी यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या की, संविधानाने आपल्याला केवळ नागरिक बनवले नाही, तर समान अधिकार व समान प्रतिष्ठा असलेल्या समाजाचे सदस्य बनवले आहे. संविधान समजून घेणे व त्यातील मूल्ये आपल्या आचार-विचारांत आणि जीवनात जगणे, हाच संविधान दिनाचा खरा सन्मान ठरेल." विद्यार्थ्यांनी संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार करून देशाची एकता व अखंडता जपणारे सुजाण, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन. यावेळी उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून भारतीय संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या उदात्त मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. संविधान दिनानिमित्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करून त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यालयातून काढण्यात आलेल्या या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संविधानाचे महत्त्व, नागरिकांची कर्तव्ये, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाही मूल्यांचा संदेश रॅलीद्वारे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत संविधानाची निर्मिती, संविधानातील तरतुदी, मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेविषयीचे आपले ज्ञान प्रदर्शित केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याबरोबरच संविधानाविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासाही निर्माण झाली. याशिवाय विद्यार्थ्यांनी विविध धर्मांचे आणि संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे पारंपरिक पोशाख परिधान करून राष्ट्रीय एकात्मतेचा सुंदर संदेश देणारे नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या हातातील राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे आकर्षक पोस्टर्स या सादरीकरणाचे विशेष आकर्षण ठरले. विविधतेत एकता हेच भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून सर्व धर्म, भाषा आणि संस्कृतींचा आदर राखणे हीच खरी संविधानिक मूल्यांची जपणूक आहे, हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक सादरीकरणातून प्रभावीपणे दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते प्रत्यक्ष अंमल बजावणीपर्यंत मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक ठरला.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, राष्ट्रीय एकात्मतेची भावना, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला. संविधानाने दिलेली मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या आचार-विचारांत आणि कृतीत उतरविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
संविधानाचा सन्मान, लोकशाहीचा अभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा निर्धार' या भावनेने विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा*
November, 27 2026
*वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शैक्षणिक सहल संपन्न*
November, 27 2026
*परप्रांतीय लोंढे थांबवणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाचल ग्रामपंचायतीला निवेदन*
November, 26 2026
*जावडे प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप, कर्मचारी कमतरतेचे कारण पुढे,‌ 24 तास डॉक्टर आणि रिक्त पदे भरण्याची प्रितेश पवार यांची मागणी*
November, 26 2026
*महाराष्ट्र अंनिसवर समाज परिवर्तनाची महत्त्वाची जबाबदारी-नीरजा*
November, 26 2026

थोडक्यात बातमी

*एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा*
November, 27 2026
*वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शैक्षणिक सहल संपन्न*
November, 27 2026
*परप्रांतीय लोंढे थांबवणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाचल ग्रामपंचायतीला निवेदन*
November, 26 2026
*जावडे प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप, कर्मचारी कमतरतेचे कारण पुढे,‌ 24 तास डॉक्टर आणि रिक्त पदे भरण्याची प्रितेश पवार यांची मागणी*
November, 26 2026
*महाराष्ट्र अंनिसवर समाज परिवर्तनाची महत्त्वाची जबाबदारी-नीरजा*
November, 26 2026

थोडक्यात बातमी

*एस. ए. मिशन विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा*
November, 27 2026
*वसंतराव नाईक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे शैक्षणिक सहल संपन्न*
November, 27 2026

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज