*युवक मंडळ शिरवली संलग्न मौजे शिरवली ग्राम विकास मंडळाने दिल्या नासा, इस्त्रो दौऱ्यासाठी जाणाऱ्या विधी धुर्येला शुभेच्छा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*युवक मंडळ शिरवली संलग्न मौजे शिरवली ग्राम विकास मंडळाने दिल्या नासा, इस्त्रो दौऱ्यासाठी जाणाऱ्या विधी धुर्येला शुभेच्छा*
*युवक मंडळ शिरवली संलग्न मौजे शिरवली ग्राम विकास मंडळाने दिल्या नासा, इस्त्रो दौऱ्यासाठी जाणाऱ्या विधी धुर्येला शुभेच्छा*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील पू. प्रा.शाळा शिरवलीच्या कु. विधी विजय धुर्ये या विद्यार्थिनीने आपली मेहनत, गुरुजींचे अथक प्रयत्न, जिद्द आणि बुद्धिमत्तेचा जोरावर जगाच्या आणि देशाच्या प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्था नासा व इस्त्रो येथे जाण्याची संधी प्राप्त झाली आहे.
विधीच्या यशाने कुटुंबाबरोबर आपल्या शाळेचे, गावाचे नाव रोशन केले आहे तिची अवकाशाला गवसणी घालण्याची जिद्द गावातील इतर मुलांना निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. तिच्या यशात यशवंत गोतावडे, श्रद्धा संतोष दळवी, उमेश केशव केसरकर, यांचा मोलाचा वाटा आहे मोठी स्वप्ने पहा आणि स्वप्नांना कष्टाची जोड द्या यशाची नवी शिखरे तुम्हाला साद घालतील हेच विधी धुर्येने दाखवून दिले आहे तिच्या यशाने शिरवली गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे, नासा, इस्त्रोसाठी निवड झालेल्या विधी विजय धुर्येचे युवक मंडळ शिरवली आणि मौजे शिरवली ग्राम विकास मंडळ मुंबई व ग्रामीण यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



