*जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 28 व 29 नोव्हेंबरला विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन, पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र सादर करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 28 व 29 नोव्हेंबरला विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन, पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र सादर करण्याचे आवाहन*
*जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 28 व 29 नोव्हेंबरला विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन, पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह गणना प्रपत्र सादर करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार (ASDD) मतदारांची नावे मतदार यादीत नोंदणी सुलभ व्हावे यासाठी 28 व 29 नोव्हेंबर 2026 रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या शिबिरांमध्ये पात्र मतदारांना गणना प्रपत्र(Enumeration Form) सादर करता येणार आहे. गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत, गणना प्रपत्रे निकाली काढण्याची कार्यवाही 10 डिसेंबरपर्यंत, दावे व हरकतींचा निपटारा 15 डिसेंबर रोजी, तर अंतिम मतदार यादी 22 डिसेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ज्या मतदारांची नावे अनुपस्थित, स्थलांतरित किंवा दुबार मतदारांच्या यादीत समाविष्ट झाली आहे. अशा पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या मतदान केंद्रावरील शिबिरात उपस्थित राहून गणना प्रपत्र सादर करावे. जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन मतदार यादीतील आपले नाव अद्ययावत करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी केले आहे.



