*नंदुरबार जिल्ह्यातील 75 गावांना 26 हजार हेक्टर क्षेत्राला, नर्मदा-तापी वळण योजनेमुळे मिळणार सिंचनाचा लाभ,जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नांना यश, 5548.04 कोटी रुपये इतक्à
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्यातील 75 गावांना 26 हजार हेक्टर क्षेत्राला, नर्मदा-तापी वळण योजनेमुळे मिळणार सिंचनाचा लाभ,जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नांना यश, 5548.04 कोटी रुपये इतक्à
*नंदुरबार जिल्ह्यातील 75 गावांना 26 हजार हेक्टर क्षेत्राला, नर्मदा-तापी वळण योजनेमुळे मिळणार सिंचनाचा लाभ,जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नांना यश, 5548.04 कोटी रुपये इतक्या किमतीस प्रशासकीय मान्यता*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नर्मदा- तापी वळण योजनेला गती मिळाली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे नर्मदा खोऱ्यातील उपलब्ध पाणी तापी खोऱ्यात वळवून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा व धडगाव तालुक्यांतील शेतजमिनी सिंचनाखाली आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या योजनेसाठी 5548.04 कोटी रुपये खर्चाच्या कामास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे जिल्ह्यातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत. तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव अंतर्गत नर्मदा नदी व तापी नदी या दोन खोऱ्यांमध्ये नर्मदा- तापी वळण योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. नर्मदा पाणी तंटा लवादाच्या अंतिम निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास येणाऱ्या नर्मदा खोऱ्यातील उपलब्ध पाण्यापैकी 6 वळण बंधारे, कालवा व बोगद्यांद्वारे तापी खोऱ्यात वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत नर्मदा खोऱ्यातील खडकी, लेकडा, वेलखेडी, मांजरी, राजबर्डी व शेलकुई या सहा ठिकाणी वळण बंधारे बांधण्यात येणार आहेत. या माध्यमातून उपलब्ध पाणी बोगदे व जोड कालव्याद्वारे जलोला धरणात साठविण्यात येणार आहे. त्यानंतर बोगद्याद्वारे हे पाणी तापी खोऱ्यात वळवून 11.50 मेगावॅट वीजनिर्मिती करण्याचे तसेच वाहून जाणारे पाणी पुढे गोपालपूर बंधाऱ्यापर्यंत नेऊन ते बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे 23 हजार 526 हेक्टर व वैयक्तिक उपसाद्वारे 3 हजार असे एकूण 26 हजार 526 हेक्टरक्षेत्रावर पाणी पोहोचविण्याचे नियोजन आहे. या योजनेद्वारे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या माध्यमातून शहादा, तळोदा व धडगाव तालुक्यांतील एकूण 26 हजार 526 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये शहादा तालुक्यातील 9 हजार 410 हेक्टर, तळोदा तालुक्यातील 14 हजार 116 हेक्टर आणि धडगाव तालुक्यातील 3 हजार हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यामुळे या परिसरातील 75 गावातील 26 हजार 526 हेक्टर सिंचनाचे नियोजन आहे. या महत्त्वपूर्ण योजनेसाठी सविस्तर सर्वेक्षण, संकल्पन, आवश्यक वैधानिक मान्यता तसेच वनजमीन संपादनासह विविध बाबींची कार्यवाही करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या बांधकाम घटकांसाठी 5548.04 कोटी रुपये इतक्या किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील सिंचन सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने या योजनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, परिसरातील कृषी उत्पादन वाढविण्यास आणि ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळण्यास हातभार लागणार आहे.



