*धुळे डाक विभागातर्फे पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र विशेष मोहीम,पोस्टमनद्वारे घरपोच सेवा, फेस ऑथेंटिकेशनने हयातीचा दाखला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*धुळे डाक विभागातर्फे पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र विशेष मोहीम,पोस्टमनद्वारे घरपोच सेवा, फेस ऑथेंटिकेशनने हयातीचा दाखला*
*धुळे डाक विभागातर्फे पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र विशेष मोहीम,पोस्टमनद्वारे घरपोच सेवा, फेस ऑथेंटिकेशनने हयातीचा दाखला*
नंदुरबार(प्रतिनिधी):-केंद्र व राज्य शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन नियमित सुरू राहण्यासाठी हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) सादर करणे आवश्यक असते. ही प्रक्रिया सुलभ व जलद करण्यासाठी धुळे डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून 1 ते 30 नोव्हेंबरदरम्यान 'डिजिटल जीवन प्रमाणपत्र' (DLC) विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. धुळे डाक विभागातील सर्व पेन्शनधारकांनी या मोहिमेचा व डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर, धुळे राजीव पालेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या मोहिमेअंतर्गत पोस्टमनद्वारे पेन्शनधारकांना घरपोच डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वयोवृद्ध, आजारी आणि एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बँक किंवा इतर केंद्रांवर जाण्याची गरज भासणार नाही. वाढत्या वयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिक मशीनवर स्पष्ट उमटत नसल्याने पडताळणीमध्ये अडचणी येतात. ही समस्या दूर करण्यासाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. अँड्रॉइड किंवा आयओएस स्मार्टफोनच्या माध्यमातून चेहरा ओळख पडताळणी करून अवघ्या 60 सेकंदांत डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करता येते. याशिवाय बायोमेट्रिक पडताळणीचाही पर्याय उपलब्ध आहे. 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांसाठी घरपोच सेवा व विशेष मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुविधेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाचणार असून हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.
धुळे डाक विभागातील सर्व सेवानिवृत्त कर्मचारी व पेन्शनधारकांनी 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या या विशेष मोहिमेचा तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या घरपोच डिजिटल सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे विभागाचे प्रवर अधीक्षक डाकघर पालेकर यांनी केले आहे.



