*जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन*
*जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या; परंतु अद्याप जात वैधता प्रमाणपत्र निर्णय प्रक्रियेत असलेल्या पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जातील त्रुटींची ऑनलाईन पूर्तता करावी, असे आवाहन, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव योगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय/आयुष शिक्षण आणि कला शिक्षण विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आल्या आहेत. राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अद्याप प्रक्रियेत आहे. या पात्र विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्तता करण्याबाबत संबंधित समित्यांमार्फत एसएमएस, ई-मेल व पत्राद्वारे कळवण्यात आले आहे; मात्र त्यानंतरही अनेक अर्जदार व विद्यार्थ्यांनी संबंधित समित्यांशी संपर्क साधलेला नाही.
जात वैधता प्रमाणपत्राअभावी कोणताही मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी अद्याप त्रुटींची पूर्तता न केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जदार लॉगिनवरून तात्काळ ऑनलाईन त्रुटी पूर्तता करावी. अर्जदारांच्या शंका निरसन व मदतीसाठी www.cvc.barti.in या नवीन पोर्टलवर बार्टी हेल्प डेस्क अंतर्गत (०२०) २६३३३३३९ हा दूरध्वनी क्रमांक, ९४०४९९९४५२ हा व्हॉट्सॲप क्रमांक (फक्त व्हॉट्सॲप मेसेजसाठी) आणि helpdesk@barti.in हा ई-मेल उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्रुटी पूर्तता करण्याची जबाबदारी अर्जदारांची राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी व पालकांनी या नवीन पोर्टलचा व सुधारित नागरिक-केंद्रित सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नंदुरबार येथील अध्यक्ष श्रीमती वंदना सूर्यवंशी, उपायुक्त तथा सदस्य श्रीमती वैशाली हिंगे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव योगेश पाटील यांनी केले आहे.



