*30 नोव्हेंबरला कोराडी येथे 23 वी सब-ज्युनिअर राज्यस्तरीय,वुशु निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*30 नोव्हेंबरला कोराडी येथे 23 वी सब-ज्युनिअर राज्यस्तरीय,वुशु निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन*
*30 नोव्हेंबरला कोराडी येथे 23 वी सब-ज्युनिअर राज्यस्तरीय,वुशु निवड चाचणी स्पर्धांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने 23वी सब- ज्युनिअर राज्यस्तरीय वुशु (मुले व मुली) निवड चाचणी स्पर्धा 2026-27 चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 30 नोव्हेंबर 2026 रोजी तालुका क्रीडा संकुल, कोराडी, नागपूर येथे होणार आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे- निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू, संघ व पंचांनी सकाळी 8 वाजेपर्यंत उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळी 8 ते 10 या वेळेत खेळाडूंचे वजन व तांत्रिक बैठक होईल. सकाळी 10.30 वाजता प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांची बैठक, तर 11.30 वाजता स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात येईल. सकाळी 11 वाजता उद्घाटन सोहळा झाल्यानंतर 11.30 वाजेपासून सांशू (सांडा) व ताओलू (पारंपरिक कुंग-फू) या प्रकारांतील सामने सुरू होतील. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत समारोप समारंभ होणार आहे. या निवड चाचणी स्पर्धेतील प्रत्येक खेळ प्रकार व वजनी गटात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंची 26 व्या राष्ट्रीय सब- ज्युनिअर वुशु (मुले व मुली) अजिंक्यपद स्पर्धा 2026-27 साठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी, नागपुर स्वप्निल बनसोड (९८२२६८२६३९) किंवा नागपूर जिल्हा वुशु असोसिएशनचे सचिव दीपक भिसेन (मो. ९९२१८५९२१५) यांच्याशी संपर्क साधावा.



