*डॉक्टर हिना गावित यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये साजरा केला मोठा दिपोत्सव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉक्टर हिना गावित यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये साजरा केला मोठा दिपोत्सव*
*डॉक्टर हिना गावित यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये साजरा केला मोठा दिपोत्सव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-उत्तर प्रदेशातील कुशीनगर विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क करण्याच्या दरम्यान भाजपाच्या विस्तारक तथा माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी कुशीनगरमधील संस्थेने आयोजित केलेल्या दीपोत्सवात सहभागी होत मान्यवरांसमवेत देव दीपावली मोठ्या उत्साहात साजरी केली.
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक आणि प्रचारात्मक पूर्वतयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्यावर विस्तारक पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली असून सध्या डॉ हिना गावित उत्तर प्रदेशातील कुशीनगर विधानसभा क्षेत्रात स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत जनतेशी संवाद करण्यासाठी वेगवेगळ्या भागात भेटी देत आहेत.
दरम्यान, 24 नोव्हेंबर 2026 रोजी देव दीपावली सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यादरम्यान उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे कला व साहित्याला समर्पित अखिल भारतीय संस्था ‘संस्कार भारती’ च्या वतीने भाजपाच्या विस्तारक तथा माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्तिक पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरात दीपप्रज्वलन करून उत्सवी वातावरणात कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, कलाप्रेमी आणि मान्यवर उपस्थित होते. भारतीय संस्कृती, कला, साहित्य व परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दीपोत्सवात सहभाग घेतला.



