*कोंडसर बुद्रुकमधील खड्डेमय रस्त्याविरोधात मनसेचा एल्गार 15 दिवसांचा अल्टिमेटम,अन्यथा तीव्र भूमिका घेण्याचा इशारा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोंडसर बुद्रुकमधील खड्डेमय रस्त्याविरोधात मनसेचा एल्गार 15 दिवसांचा अल्टिमेटम,अन्यथा तीव्र भूमिका घेण्याचा इशारा*
*कोंडसर बुद्रुकमधील खड्डेमय रस्त्याविरोधात मनसेचा एल्गार 15 दिवसांचा अल्टिमेटम,अन्यथा तीव्र भूमिका घेण्याचा इशारा*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील आडिवरे कोंडसर बुद्रुक येथील टेंबाची वाडी, जांभरा देवी स्टॉप ते पोवार वाडीला जोडणाऱ्या खड्डेमय आणि उखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून उर्वरित भागाचे डांबरीकरण करावे, या मागणीसाठी मनसेच्या वतीने ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवक यांना निवेदन देण्यात आले. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेला मार्ग आणि डांबरीकरणाचा अभाव यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखलामुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी मनसेने केली आहे. येत्या 15 दिवसांत खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम सुरू करावे आणि उर्वरित रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव मार्गी लावावा, अन्यथा नागरिकांच्या हक्कांसाठी मनसे तीव्र भूमिका घेईल, असा इशारा युवा कार्यकर्ते रोहित पोवार यांनी दिला. यावेळी मनसे कार्यकर्ते मिलिंद पांचाळ, निलेश चिपटे, गौरव सुतार, ओमकार मोगरकर आणि शुभम पांचाळ उपस्थित होते.



