*एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा कार्यक्षेत्रामध्ये 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान 'जनजातीय गौरव सेवा सप्ताह -2026' चे भव्य आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा कार्यक्षेत्रामध्ये 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान 'जनजातीय गौरव सेवा सप्ताह -2026' चे भव्य आयोजन*
*एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा कार्यक्षेत्रामध्ये 11 ते 18 नोव्हेंबरदरम्यान 'जनजातीय गौरव सेवा सप्ताह -2026' चे भव्य आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा कार्यक्षेत्रामध्ये 11 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 'जनजातीय गौरव सेवा सप्ताह 2026' चे भव्य आयोजन क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध लोककल्याणकारी, सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन आदिवासी समाजाचे हक्क, जल-जंगल-जमीन यांचे संरक्षण आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अतुलनीय योगदान देणारे महान आदिवासी जननायक क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या निर्देशानुसार, नंदुरबार जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा कार्यक्षेत्रामध्ये 11 ते 18 नोव्हेंबर 2026 या कालावधीत 'जनजातीय गौरव सेवा सप्ताह 2026'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात माहिती देण्यासाठी तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, तसेच अक्कलकुवा अकरानी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, या आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तळोदा तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लगिमा तिवारी यांच्यासह तळोदा तहसीलदार उपस्थित होते. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना आमदार राजेश पाडवी व आमदार आमश्या पाडवी यांनी दिनांक 11 ते 18 नोव्हेंबर दरम्यान साजरा होणाऱ्या क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले असून त्या संदर्भात सखोल माहिती देण्यात आली आहे.
दिनांक 15 नोव्हेंबर 2026 रोजी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती 'जनजातीय गौरव दिन' म्हणून जिल्हाभरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण, आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या सप्ताहाचे आयोजन जिल्हा प्रशासन, आदिवासी विकास विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांच्या सक्रिय लोकसहभागातून करण्यात येत आहे. सेवा सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम व नियोजन दिनांक 11 व 12 नोव्हेंबर 2026 जनजागृती व प्रसिद्धी, जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, तसेच तळोदा, अक्कलकुवा व धडगाव येथे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या समन्वयातून तालुकास्तरीय पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे, 13 नोव्हेंबर 2026 कल्याणकारी योजनांचा लाभ वितरण व जनजागृती, केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजनेंतर्गत नागरिकांना विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन देण्यात येणार आहेत. तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प (न्युक्लिअस बजेट) योजना सन 2025-26 अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात येणार आहे. 14 नोव्हेंबर 2026 स्मारक स्वच्छता, दीपोत्सव व आदिवासी संस्कृती दर्शन या दिवशी तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या तालुक्यातील आदिवासी महापुरुषांच्या स्मारकांची, सार्वजनिक ठिकाणी स्थापित पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच स्मारकस्थळी दीपोत्सव आयोजित करून आदिवासी समाजाच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करण्यात येणार आहे. आदिवासी देव-देवता, पारंपरिक पूजा पद्धती, लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि आदिवासी अस्मितेबाबत जनजागृती करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी तळोदा, अक्कलकुवा व धडगांव येथील गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, शासकीय व अनुदानित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक तसेच शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांचे गृहपाल यांना परस्पर समन्वय साधून कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
तिन्ही तालुक्यांसाठी तालुका समन्वय अधिकाऱ्यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच आदिवासी सेवा केंद्र स्थापन असलेल्या 323 गावांमधील आदि स्वयंसेवकांच्या माध्यमातून ग्रामस्थांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 15 नोव्हेंबर 2026 क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती व मुख्य शासकीय कार्यक्रम भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथील नियोजन भवनात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना (न्युक्लिअस बजेट) अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या आदिवासी महिला बचत गटांना प्रत्येकी रुपये 10,000 अर्थसहाय्य वितरित करण्यात येईल. न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत पात्र वैयक्तिक लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात येतील. आदिवासी वैदू भगत यांना प्रमाणपत्र व पारितोषिकांचे वितरण करण्यात येईल. वनहक्क कायद्यांतर्गत वनपट्टेधारक शेतकऱ्यांना 7/12 व 8-अ उताऱ्यांचे वितरण करण्यात येईल. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकांचा गौरव व पारितोषिक वितरण करण्यात येईल. नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल. तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या तीनही तालुक्यातील 323 गावांमधील आदिवासी सेवा केंद्रांवर आदि स्वयंसेवकांच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. 16 नोव्हेंबर 2026 नागरी सेवा व शासकीय कागदपत्रे शिबिर
नागरिकांना विविध शासकीय सेवा व दाखले सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यांतील नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर विशेष सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. आधार कार्ड दुरुस्ती तसेच जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला व इतर आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून देण्यासाठी सेतू सुविधा केंद्रांच्या माध्यमातून विशेष शिबिरे तहसीलदार आयोजित करतील. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी नोंदणी, पीकविमा तसेच इतर आवश्यक ऑनलाइन कृषी सेवांचा लाभ आदिवासी शेतकऱ्यांना मिळावा यासाठी जिल्ह्यातील कृषी विभाग त्यास्तरावर करतील यासाठी आश्रमशाळांचे मुख्याध्यापक व शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांचे गृहपाल यांना संबंधित विभागांशी समन्वय साधून जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ मिळवून देण्याबाबत कार्यवाही करतील तसेच आदि कर्मयोगी च्या माध्यमातुन तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील 323 गावांमधील आदि स्वयंसेवकांच्या माध्यमातून ग्रामस्थांना या सेवा शिबिरांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
17 नोव्हेंबर 2026 आरोग्य व पोषण जनजागृती शिबि, आदिवासी समाजातील नागरिकांचे आरोग्य व पोषणविषयक प्रश्न लक्षात घेऊन तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यांतील गावांमध्ये आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात रक्तदाब, मधुमेह तपासणी, सिकलसेल आजाराबाबत जनजागृती तसेच माता व बाल आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार हे समन्वय साधून कार्यवाही करतील. 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती महिला व स्तनदा मातांच्या आरोग्य आणि पोषणविषयक गरजा लक्षात घेऊन प्रत्येक अंगणवाडी केंद्रात विशेष मार्गदर्शन व जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद नंदुरबार हे करतील. तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या तालुक्यातील 323 गावांमधील आदि स्वयंसेवकांच्या माध्यमातून आरोग्य व पोषणविषयक उपक्रमांमध्ये ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळविण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. 18 नोव्हेंबर 2026 सक्षमीकरण व सेवा सप्ताहाचा समारोप
जनजातीय गौरव सेवा सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी 11 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध शासकीय विभाग व यंत्रणांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांचा आढावा घेण्यात येणार आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा यांच्या स्तरावर सर्व संबंधित विभागांकडून कार्यक्रमांचे अहवाल संकलित करून त्याचा एकत्रित अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या ठळक उपलब्धी व विशेष उपक्रम, आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सक्षमीकरण, आरोग्य सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि रोजगाराभिमुख संधी निर्माण करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध महत्त्वपूर्ण निर्णय व उपक्रम राबविण्यात येत आहेत. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती, आदिवासी विकास विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवून शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामुळे आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यास मदत होणार आहे, आश्रमशाळांची श्रेणीवाढ, आदिवासी विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी व 12 वीच्या शिक्षणाची सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हावी आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी आवश्यक संधी मिळाव्यात, या उद्देशाने तळोदा प्रकल्पांतर्गत 2 आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यात आली आहे. याबाबत आदिवासी विकास विभागाच्या 11 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. आश्रम शाळांमधील आरोग्य सुविधा बळकटीकरण, आदिवासी विद्यार्थ्यांना वेळेवर व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक प्रकल्प कार्यालयात बाह्यस्रोताद्वारे प्रत्येकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आश्रम शाळांमधील मुला-मुलींच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्यासाठी परिचारिकांचीही बाह्यस्रोताद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होत आहे. प्रकाशवाटा उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, नंदुरबार जिल्ह्यातील गरजू व होतकरू आदिवासी विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने 'प्रकाशवाटा' उपक्रमांतर्गत NEET यांसारख्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विशेष अभ्यासवर्गाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन, जनजातीय गौरव सेवा सप्ताह हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदान यांचा सन्मान करण्याचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.या सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, आरोग्य व शैक्षणिक सुविधांबाबत जनजागृती करणे, महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा जिल्हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. तरी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट, विद्यार्थी, शिक्षक, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी या सप्ताहात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन जनजातीय गौरव सेवा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



