*पार्थभैया इलेव्हन क्रिकेट संघाच्या गणवेशाचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पार्थभैया इलेव्हन क्रिकेट संघाच्या गणवेशाचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण*
*पार्थभैया इलेव्हन क्रिकेट संघाच्या गणवेशाचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरात 13 नोव्हेंबरपासून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पार्थभैया इलेव्हन क्रिकेट संघाच्या अधिकृत गणवेशाचे लोकार्पण शिवसेनेचे नेते तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि युवा नेते, नगरसेवक किरण उर्फ गोलू भैय्या रघुवंशी यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेसाठी पार्थभैया इलेव्हन संघ सज्ज झाला असून, संघातील खेळाडू नव्या गणवेशात मैदानात उतरून आपले कौशल्य दाखवणार आहेत. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे तसेच युवा खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळावी, या दृष्टीने पार्थभैया इलेव्हन क्रिकेट संघाची स्थापना करण्यात आली आहे. पार्थभैया इलेव्हन क्रिकेट संघात रोहित पटेल, कुणाल वसावे, बंटी सूळ, राजा मराठे, निहाल अन्सारी, सचिन जाधव, योगेश पाटील, कपिल पटेल, अनिकेत इंद्रजीत, अक्षय कोचर, सुमित मराठे, हेमंत पाटील, सौरभ पाटील, देवेंद्र शर्मा आणि आकाश वळवी या खेळाडूंचा समावेश आहे.



