*खटवाणी येथे वाडीधाम प्रेरित वीर भाथीजी महाराज यांचा 10नोव्हेंबर 2026रोजी 57वा जन्मजयंती महोत्सव*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खटवाणी येथे वाडीधाम प्रेरित वीर भाथीजी महाराज यांचा 10नोव्हेंबर 2026रोजी 57वा जन्मजयंती महोत्सव*
*खटवाणी येथे वाडीधाम प्रेरित वीर भाथीजी महाराज यांचा 10नोव्हेंबर 2026रोजी 57वा जन्मजयंती महोत्सव*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-अक्कलकुवा तालुक्यातील खटवाणी येथे वाडीधाम प्रेरित वीर भाथीजी महाराज यांचा 57 वा जन्म जयंती महोत्सव अर्थात एकम, 10 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाच्या नियोजनाची बैठक खटवाणी येथे भाथीजी महाराज संप्रदाय वाडीधामचे मुख्य आचार्य प.पु. गोविंददास महाराज वाडी धाम ट्रस्ट प्रमुख प. पु. अजबसिंग महाराज यांच्या मार्गदर्शनाने खटवाडी येथे अंतिम नियोजनाची बैठक एकम नियोजन समिती प्रमुख नागेश पाडवी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप वसावे, जगदीश वसावे , वाडीधाम ट्रस्टचे श्यामसिंग वसावा, सोमभाई वसावा, जमूभाई वसावा, दिलीप वसावे, रतिलाल वसावा, आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. फागवेल प्रेरित 483 जन्म जयंती वाडीधाम प्रेरित श्री भाथीजी महाराज प्रगट दिवस अर्थात 57 वी एकम महोत्सवाचे आयोजन 10 नोव्हेंबर 2026 रोजी खटवाणी ता. अक्कलकुवा येथे आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाच्या नियोजनासाठीची अंतिम नियोजन बैठक नुकतीच खटवाणी येथे संपन्न झाली. या बैठकीत एकम महोत्सव उत्साहात व सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात येऊन सविस्तर चर्चा करण्यात आली, बैठकीत स्वयंपाक समिती, भोजन वाटप समिती, बैठक व्यवस्था समिती, पार्किंग समितीसह विविध समित्यांनी आपल्या नियोजनाची माहिती दिली. बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी भाथीजी संप्रदायाचे उप आचार्य कंठीगुरु, सरपंच उपसरपंच पोलीस पाटील, तालुक्यातील आजी -माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील आजी- माजी तसेच खटवाणी येथिल भाथीजी महाराज भक्त मंडळ व ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर भाथीजी महाराज यांची जन्म जयंती अर्थात एकम महोत्सव 10 नोव्हेंबर 2026 रोजी खटवाणी ता. येथे विविध कार्यक्रमांनी पार पडणार असून या महोत्सवात वीर भातीजी महाराज संप्रदायाचे महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या तीन राज्यातील भक्तगण लाखोंच्या संख्येने मनोभावे सहभागी होणार आहेत. गुजरात राज्यातील वाडीधाम येथील वीर भाथीजी महाराज संप्रदायाचे परमपूज्य माधुदासजी महाराज आद्य संस्थापक असून परमपूज्य गोविंददासजी महाराज मुख्य आचार्य असून परमपूज्य अजबसिंगजी महाराज ट्रस्ट प्रमुख आहेत. हा एकम महोत्सव भाविकांना मनोभावे उत्साहात व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली असून या नियोजन समितीचे प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी यांची निवड करण्यात आली आहे. हजेरी लावणाऱ्या लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.



