*आदिवासी पाड्यांतील भगिनींसाठी भाऊबीज भेट म्हणून 'एक साडी' देण्याचे कोकण कट्टाचे आवाहन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आदिवासी पाड्यांतील भगिनींसाठी भाऊबीज भेट म्हणून 'एक साडी' देण्याचे कोकण कट्टाचे आवाहन*
*आदिवासी पाड्यांतील भगिनींसाठी भाऊबीज भेट म्हणून 'एक साडी' देण्याचे कोकण कट्टाचे आवाहन*
विलेपार्ले(प्रतिनिधी):-दिपावली हा सण सर्वजण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतात. यानिमित्ताने फराळ,नवे कपडे, फटाके याची लयलूट केली जाते येत्या दिपावलीच्या आनंदोत्सवाच्या निमित्ताने आदिवासी पाड्यांवरील भगिनींना सुध्दा दिपावली साजरी करता यावी या हेतूने कोकण कट्टा या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 'एक नवी साडी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दुर्गम भागातील गरजू आदिवासी पाड्यांवरील भगिनींना एक साडी भेट देण्यात येणार आहे इच्छुक व्यक्तींनी 6 किंवा 9 वारी साडी 7 नोव्हेंबर पर्यंत कोकण कट्टा या संस्थेकडे सुपूर्द करुन आदिवासी भगिनींच्या आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेने केले आहे
साडी भेट देण्यासाठी सुजित कदम - 9167279539,दया मांडवकर - 7777093227, विजय बाईत - 9892278063, सचिन दिवाळे - 9867097581 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा



