*जीर्ण विज खांब, लोंबकळणाऱ्या तारा कुरंग बांधवाडीत वीज वाहिन्यांपासून ग्रामस्थांना धोका*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जीर्ण विज खांब, लोंबकळणाऱ्या तारा कुरंग बांधवाडीत वीज वाहिन्यांपासून ग्रामस्थांना धोका*
*जीर्ण विज खांब, लोंबकळणाऱ्या तारा कुरंग बांधवाडीत वीज वाहिन्यांपासून ग्रामस्थांना धोका*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील कुरंग या गावी घराशेजारी विजेचे पोल सडले गेले आहेत आणि त्यातच पोल वरील विजेच्या तारा खाली लोंबकळणाऱ्या अवस्थेमध्ये दिसत आहेत. वेळोवेळी विद्युत महामंडळाला कळवून सुद्धा लक्ष दिला जात नसल्याने
युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांनी प्रत्यक्ष महावितरण भांबेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व सविस्तर चर्चा केली तरी अजून परिस्थिती आहे तशीच आहे. एकंदरीत परिस्थितीआणि
दुरवस्था पाहून खाली लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्यांमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे अनेक ठिकाणचे लाईट पोल सडलेल्या अवस्थेत असून, मुख्य वीजवाहिनीही काही ठिकाणी जमिनीजवळ खाली आलेली आहे. सचिन बेर्डे यांनी यावेळी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या परिसरात अनेक ग्रामस्थ शेतीची कामे करतात. शेतात काम करताना खाली आलेल्या वीजतारा डोक्याला किंवा शरीराला लागण्याची शक्यता असल्याने मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
या समस्येबाबत वेळोवेळी महावितरण भांबेड येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. सडलेले विजेचे खांब तातडीने बदलण्यात यावेत, मुख्य वीजवाहिनी योग्य उंचीवर न्यावी आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी आवश्यक त्या ठिकाणी नवीन पोल उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. ग्रामस्थांच्या जीविताचा प्रश्न असल्याने या कामाकडे तातडीने लक्ष द्यावे असे सचिन बेर्डे यांनी सांगितले.
गावातील सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेऊन त्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणे हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अनेक परिसरामध्ये विजेच्या धक्याने जिवित हानी होत आहे हि डोळ्यासमोरची अनेक उदाहरणे आहेत. तेंव्हा कुरंग बांधवाडीतील ग्रामस्थांना सुरक्षित वीजपुरवठा मिळावा, ही काळाची गरज आहे. आणि जिवित हानी टाळावी ही सचिन बेर्डे यांची मागणी आहे.



