*53 वी राज्यस्तरीय सब ज्युनियर ज्यूदो स्पर्धा जिल्हा निवड चाचणी, राजे शिवाजी हायस्कूल येथे 53 वी राज्य ज्यूदो स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*53 वी राज्यस्तरीय सब ज्युनियर ज्यूदो स्पर्धा जिल्हा निवड चाचणी, राजे शिवाजी हायस्कूल येथे 53 वी राज्य ज्यूदो स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी*
*53 वी राज्यस्तरीय सब ज्युनियर ज्यूदो स्पर्धा जिल्हा निवड चाचणी, राजे शिवाजी हायस्कूल येथे 53 वी राज्य ज्यूदो स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-चिंतामणी एज्युकेशन सोसायटी संचलित राजे शिवाजी हायस्कूल येथे 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता जिल्हा निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य ज्यूदो असोसिएशन व सिंधुदुर्ग जिल्हा ज्यूदो असोसिएशन आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 53 वी राज्यस्तरीय ज्यूदो सब ज्युनियर्स स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन 12 ते 15 नोव्हेंबर दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली पब्लिक स्कूल विद्यानिकेतन येथे करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये खेळाडूंचे जन्म साल 2012, 2013, 2014 असे असावे. सदर नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक असणाऱ्या ज्यूदो खेळाडू मुला / मुलींनी निवड चाचणी स्पर्धेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा ज्यूदो असोसिएशनचे अध्यक्ष गणेश मराठे यांनी केले आहे. तरी इच्छुक खेळाडूंनी 8 नोव्हेंबर रविवारी रोजी सायं ठीक. 5 वाजता राजे शिवाजी हायस्कूल हनुमंत पेट्रोल पंप प्रकाशा रोड नंदुरबार येथे उपस्थित राहावे.सोबत येताना जन्म दाखला ,आधार कार्ड व पासपोर्ट फोटो आणावे. जिल्हा स्पर्धेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या 53 वी राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. आणि सिंधुदुर्ग येथे विजयी झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे याबद्दल अध्यक्ष गणेश मराठे यांनी कळविले आहे.



