*नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी 17 नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड,प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी 17 नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड,प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी*
*नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी 17 नोव्हेंबरला ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड,प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत येणाऱ्या तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यासाठी 17 नोव्हेंबर,2026 रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा जि. नंदुरबार या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या मुलां मुर्लीना इयत्ता 1 ली या वर्गात सन 2026-27 या वर्षासाठी शासनाकडुन मंजुर झालेल्या प्रवेशित लक्षांकास अधिन राहुन शहरातील नामांकित इंग्रजी माध्यामाच्या निवासी शाळेत शासन निर्णयानुसार अटी व शतींना अधिन राहुन प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार या कार्यालयाव्दारे लाभार्थी विद्यार्थ्यांकडुन प्रवेश अर्ज मागविण्यात आलेली आहे. या प्रवेश प्रक्रियेंतर्गत एकूण 131 जागांसाठी लक्ष्यांक प्राप्त झाला आहे. त्यापैकी 57 विद्यार्थ्यांची निवड राखीव प्रवर्गातून थेट करण्यात येणार असून, उर्वरित 74 जागांसाठी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही निवड प्रक्रिया प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत पार पडणार आहे. पात्र, अपात्र व राखीव प्रवर्गातील अर्जांची छाननी करण्यात आली आहे. ईश्वर चिठ्ठीद्वारे होणारी तालुकानिहाय निवड पुढीलप्रमाणे आहे. धडगाव तालुक्यातून 27, अक्कलकुवा तालुक्यातून 24 आणि तळोदा तालुक्यातून 23 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. याशिवाय राखीव प्रवर्गातून धडगावमधील 36, अक्कलकुवा येथील 14 आणि तळोदा येथील 7 अशा एकूण 57 विद्यार्थ्यांची थेट निवड होणार आहे. प्रत्येक तालुक्यासाठी 20 विद्यार्थ्यांची (10 मुले व 10 मुली) प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी संबंधित मुदतीत प्रवेश निश्चित न करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेशाची संधी देण्यात येणार आहे. पालकांनी तसेच संबंधित शाळांनी प्रवेशासंबंधीची सर्व कार्यवाही 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करावी. निर्धारित मुदतीत प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थ्याची जागा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्याला उपलब्ध करून देण्यात येईल. मुदतीनंतर कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही. ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी 23 ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा येथून प्रवेश आदेश प्राप्त करून घ्यावेत. संबंधित शाळेत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच प्रवेश निश्चित करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत शाळा बदलून मिळणार नसल्याची नोंद पालकांनी घ्यावी. ईश्वरचिठ्ठीद्वारे विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा येथे होणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी यांनी केले आहे.



