*पुर्वीच्या मतदार यादीत नाव असूनही, आता प्रारुप मतदान यादीमध्ये नाव नसल्यास नव्याने नमुना क्र. 6 मध्ये अर्ज करणे या संदर्भात भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पुर्वीच्या मतदार यादीत नाव असूनही, आता प्रारुप मतदान यादीमध्ये नाव नसल्यास नव्याने नमुना क्र. 6 मध्ये अर्ज करणे या संदर्भात भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण*
*पुर्वीच्या मतदार यादीत नाव असूनही, आता प्रारुप मतदान यादीमध्ये नाव नसल्यास नव्याने नमुना क्र. 6 मध्ये अर्ज करणे या संदर्भात भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विशेष सखोल पुनरीक्षणा (SIR) दरम्यान प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत, ज्यांचे नाव पूर्वी मतदार यादीत होते, पण आता समाविष्ट नाही, अशा नागरिकांना मतदार यादीमध्ये नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. (Form 6) भरून नव्याने अर्ज करता येईल. पूर्वी मतदार यादीत नाव असतानाही नव्याने नमुना क्र. 6 मध्ये अर्ज केला, म्हणून खोटी घोषणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जाणार नाही, असे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. नमुना क्र. 6 मध्ये पहिल्यांदाच नाव यादीत येत असल्याची घोषणा करावी लागते. त्यामुळे पूर्वी नाव असलेले काही मतदार हा अर्ज भरताना संकोच करत असल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे. या संदर्भात आयोगाने पुढे नमूद बाबी स्पष्ट केलेल्या आहेत
नमुना क्र.6 मधील घोषणा 1 ऑगस्ट 2022 पासून लागू करण्यात आलेली आहे. प्रारूप यादीत नाव नसलेला कोणताही मतदार अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी निर्धारित प्रक्रियेनुसार नमुना क्र. 6 अर्ज भरू शकतो. मतदाराचे नाव प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यापुर्वीच्या यादीत होते की नाही, याचा अर्ज स्वीकारण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. हा अर्ज, प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट नसलेल्या मतदारांनी त्यांचे नाव नव्याने मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी केला जात असल्याने, पूर्वी त्यांचे नाव मतदार यादीमध्ये होते या कारणास्तव ही घोषणा खोटी ठरत नाही. या कारणास्तव संबंधित मतदारावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या कलम 31 नुसार कारवाई केली जाणार नाही. मात्र मतदाराचे नाव महाराष्ट्र राज्यातील अथवा देशातील इतर कोणत्याही राज्याच्या सध्याच्या मतदारयादीमध्ये नसणे आवश्यक आहे.



