*जलसंधारणाच्या लोकसहभागातून उभारलेला आदर्श*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जलसंधारणाच्या लोकसहभागातून उभारलेला आदर्श*
*जलसंधारणाच्या लोकसहभागातून उभारलेला आदर्श*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास दौरा करत असताना, आमदार आमशा पाडवी यांनी ग्रुप ग्रामपंचायत कामोद खुर्द अंतर्गत, जरली गावाला धावती भेट दिली. “पाणी आडवा, पाणी जिरवा” या अभियानांतर्गत जरली ग्रामस्थांनी लोकसहभाग व श्रमदानातून उदाई नदीवर साकारलेल्या भव्य वनराई बंधाऱ्याची आमदार आमशा पाडवी यांनी पाहणी व निरीक्षण केले, अक्राणी तालुक्यातील सुमारे 150 ते 200 मीटर लांबीचा आणि 10 ते 15 फूट खोलीचा हा वनराई बंधारा जलसंधारणाच्या दृष्टीने एक आदर्श उपक्रम ठरत आहे,
या प्रसंगी अक्राणी तालुक्याचे आमदार आमशा पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके, गणेश पराडके, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, शिवसेना अक्राणी तालुका प्रमुख संदीप वळवी, कट्रीचे सरपंच चेतन पराडके, जरली गावाचे पोलीस पाटील सुभाष पावरा, गावातील ज्येष्ठ नागरिक डेटका पावरा, खेत्या पावरा, नायका पाटील, फाड्या पावरा, बासऱ्या पावरा, सुकलाल पावरा, गुलाबसिंग पावरा, दुल्लभ पावरा, राजेंद्र पावरा, जयसिंग पावरा, किसन पावरा, रोजगार सेवक माणिक पावरा, सूर्यपूरचे उपसरपंच विजय पावरा, डेका पावरा तसेच मनखेडी गावाचे सरदार पावरा यांच्यासह अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, बालकलाकार आणि महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सदस्यांची उपस्थित होते, या वनराई बंधाऱ्याच्या उभारणीसाठी गावातील आजी माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवकवर्ग, महिला बचत गट आणि सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदान व सहकार्य केले, गावाच्या एकीचे आणि लोकसहभागाचे हे एक उत्तम उदाहरण आहे,
गावाचा विकास हा केवळ शासनाच्या योजनांमधूनच नव्हे, तर ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि लोकसहभागातूनही साध्य होतो, याचे जरली गावाने उत्तम उदाहरण घालून दिले आहे, आमदार आमशा पाडवी यांनी उपक्रमाची पाहणी करून प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे जरली ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.



