*निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानाचा लाभ घ्यावा 1 ते 30 नोव्हेंबरदरम्यान देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान-जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानाचा लाभ घ्यावा 1 ते 30 नोव्हेंबरदरम्यान देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान-जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे*
*निवृत्तीवेतनधारकांनी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानाचा लाभ घ्यावा 1 ते 30 नोव्हेंबरदरम्यान देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान-जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार यांच्यावतीने जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी 1 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत 'देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत निवृत्तीवेतनधारकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपला वार्षिक हयातीचा दाखला सुलभतेने सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. या अभियानामुळे निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया अधिक सोपी, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित झाली आहे. यासाठी निवृत्ती वेतनधारकांना विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. निवृत्ती वेतनधारक आपल्या निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँकेच्या शाखेत जाऊन हयातीचा दाखला सादर करू शकतात. तसेच निवृत्ती वेतनधारकांने बँकेने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत बायोमेट्रिक पद्धतीने अंगठ्याचा ठसा किंवा डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन करून निवृत्ती वेतनधारकांची ओळख व हयातीची खात्री केली जाईल.
'जीवन प्रमाण' (Jeevan Pramaan) या डिजिटल प्रणालीद्वारे आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन पद्धतीचा वापर करून घरबसल्या विनाशुल्क डिजिटल हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या मोबाईलमध्ये 'Jeevan Pramaan' आणि 'Aadhaar Face RD' ही आवश्यक ॲप डाउनलोड करावीत. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून चेहरा ओळख तंत्रज्ञानाद्वारे आपली ओळख प्रमाणित करावी व डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे. कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी पुनर्विवाह केला असल्यास त्याबाबतची आवश्यक माहिती संबंधित नोंदींमध्ये नमूद करावी. तसेच निवृत्ती वेतनधारकांच्या वैयक्तिक माहितीत किंवा अन्य नोंदींमध्ये काही बदल असल्यास त्याची माहिती संबंधित बँकेला द्यावी. डिजिटल हयातीचा दाखला यशस्वीरीत्या सादर केल्यानंतर प्राप्त होणारी पावती किंवा प्रमाणपत्राचा क्रमांक भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवावा.
जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी 1 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत या अभियानात सहभागी होऊन जास्तीत जास्त संख्येने डिजिटल पद्धतीने आपला वार्षिक हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे आणि अपर कोषागार अधिकारी दिलीप बागुल यांनी केले आहे.



