*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून तयार केले आकाश कंदील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून तयार केले आकाश कंदील*
*देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून तयार केले आकाश कंदील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी संचलित श्री.आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे आगामी दीपावली सणाच्या उत्सवानिमित्त आकाश कंदील निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इ.5वी ते इ.7वी 'अ' गट तर इ.8वी ते इ.10वी 'ब' गट या गटात स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या सर्जनशीलतेचा,कलात्मकतेचा व हस्त कौशल्याद्वारे विविध रंगांचे कागद,सजावटीच्या साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाश कंदील तयार केले होते. खोंडामळी केंद्राच्या केंद्रप्रमुख निकिता जाधव, माजी प्रभारी केंद्रप्रमुख आनंदराव करणकाळ, मुख्याध्यापक दासू गांगुर्डे, बापु ठाकरे, उपशिक्षक एम.डी.नेरकर, वाय.डी.बागुल, डॉ.आर.आर. बागुल यांच्या परीक्षणातून 'अ' गटातून प्रथम सोहम नरेंद्र ठाकूर, द्वितीय आरोही सुनिल मराठे, तृतीय चैताली राहुल पाटील, दीक्षा अनिल पाटीलने उत्तेजनार्थ बक्षीस संपादन केले तसेच 'ब' गटातून प्रथम मानसी संदीप पाटील, द्वितीय तुषार रामचंद्र पाटील, तृतीय दिव्या पावभा ठाकरे तर सलोनी कालूसिंग भील उत्तेजनार्थ बक्षीसाची मानकरी ठरली. बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके व मान्यवरांकडून शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना उपशिक्षक सी.व्ही. नांद्रे,एस.एच. गायकवाड डी.बी. भारती, एम.एस. मराठे, ए.एस. बेडसे यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जे.एस. पाटील, एस.जी.पाटील, एच.एम.खैरनार यांनी संयोजन केले.



