*दक्षता जनजागृती सप्ताह 2026 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दक्षता जनजागृती सप्ताह 2026 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग*
*दक्षता जनजागृती सप्ताह 2026 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नाशिक परिक्षेत्र, नाशिक चे पोलीस अधिक्षक भारत तांगडे यांच्या अधिपत्याखाली दक्षता जनजागृती सप्ताह च्या अनुषंगाने 27 ऑक्टोबर 2026 व 28 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिक परिक्षेत्रातील नाशिक शहरात व ग्रामीण भागवत तसेच अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार व जळगाव घटक कार्यालया कडील अधिकारी व अंमलदार यांच्या कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती करण्यात आली.
त्यानुसार नाशिक शहरात अधिकारी व अंमलदार यांनी गर्दीचे, वर्दळीचे ठिकाणी नागरीकांसोबत चर्चा सत्र आयोजीत करून त्यांच्यामध्ये जनजागृती केली. अपर पोलीस अधिक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी येथे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक यांचेकरीता व्याख्यान आयोजीत करून भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत माहीती देण्यात आली. नाशिक शहरातील भुजबळ नॉलेज सिटी येथे कार्यशाळेच्या माध्यमातुन विदयार्थाच्या भ्रष्टाचार निर्मुलनाचत समस्या जाणुन घेण्यात आल्या व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नाशिक शहरातील इतर महाविदयालयात भ्रष्टाचार निर्मुलनाकरीता मार्गदर्शन करण्यात आले. शहरातील बसस्टॅक, शासकीय कार्यालय इतर गर्दीच्या ठिकाणी चर्चासत्र आयोजीत कलन हॅण्डबिलाचे वाटप करण्यात आले. नाशिक शहरातील वेगवेगळ्या परिसरातील डीजीटल बॅनर वर भ्रष्टाचार निमुर्लन चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. शहरातील विविध सिनेमागृहात सिनेमा त्किनवर चित्रफित प्रर्दशित करून मनोरंजनाचे माध्यमातुन भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती करण्यात आली. नाशिक शहरा व्यतिरीक्त त्रंबकेश्वर, निफाड, येवला, मालेगाव, मनमाड, लासलगाव, चांदवड येथील शासकीय कार्यालयास भेट देतुन तेथे कामकाजाकरीता देणाच्या नागरीक, शेतकरी यांना त्यांचे समस्या जाणुन मैथुन भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली. मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार व सिल्स स्टार यांनी देखील भ्रष्टाचार निर्मुलन जनजागृती मध्ये ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्राला साथ देवुन आपला सहभाग नोंदविला असुन रील्सच्या माध्यमातुन रसिकांमध्ये जनजागृती केली.
अहिल्यानगर घटकाने विद्यार्थांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलत जनजागृती करण्यासाठी प्रशासकीय करीअर अकॅडमी येथे भेट देवुन प्रबोधन करण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकरी व विविध स्तरावरील कामगार वर्गात भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती करण्यात आली. तसेच बसस्टॅण्ड व इतर गर्दीच्या ठिकाणी चर्चासत्र आयोजीत करून हॅण्डबिलाचे वाटप करण्यात आले. नंदुरबार जिल्ल्यात शहादा, अककलकुवा, या ठिकाणी विविध सरकारी कार्यालयांना भेट देऊन तथे येनार्या आदीवासी पाड्यावरील, खेडेगावातील शेतकरी, मजुर लोकांना भ्रष्टाचारासंबंधी माहीती देथुन जनजागृती करण्यात आली. जळगाव येथील शासकीय कार्यालयात शासकीस कामानिमित्त येणारे नागरीकांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती होणेसाठी चर्चासत्र आयोजीत करून त्यांना भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती सत्ताहा संदभनि माहीती देण्यात आली. तसेच नागरीकांना
लाचलुयपत प्रतिबंधक कार्यालयास संपर्क करणे सुलभ होणेकरीता त्यांना माहीती प्रत हॅण्डबिलाचे वाटप करण्यात आले. शासकीय कार्यालयाचे दर्शनी भागात भित्तीपत्रके चिकटविण्यात आली. धुळे येथील अधिकारी व अंमलदार यांनी दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालय, एस. एस. व्हि. पी. एस महाविदयालय, पालेशा महाविदयालय व जयहिंद सिनीअर कॉलेज येथे जावुन विदयार्थी यांच्या सोबत चर्चासत्राच्या माध्यमातुन भ्रष्टाचार निर्मुलनाबाबत आवाहन करून हॅण्डबीलाचे वाटप करण्यात आले.
विविध कार्यक्रमांतुन व माध्यमातुन नागरीकांपर्यंत जनजागृती करणेसाठी व भ्रष्टाचार रोखणेसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, कार्यालयाकडील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार व जळगाव येथील अधिकारी व अंमलदार यांनी कार्यकम आयोजीत केले होते. तसेच नागरिकांनी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरूध्द भ्रष्टाचारासंबंधी तकारी असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथे टोल फ्री क. 1064 व दुश्वनी कमांक 0253-2578230/2575628 यावर तसेच कॉटस्अप क्रमांक 9545651064 यावर संपर्क साधावा, असे आवाहन या सत्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक चे पोलीस अधिक्षक श्री. भारत तांगडे यांनी केले आहे, संपक पत्ता संकेतस्थळ
ई-मेल ला.प्र.वि. नाशिक परिक्षेत्र, नाशिक ऑनलाईन तकार
टोल फ्री क्रमांक
दुरध्वनी क्रमांक
शॉट्स अॅपक
acbmaharashtra.gov.in
spacbnashik@mahapolice.gov.in
acbmaharashtra.net
1064
0253-2575628, 2578230
9545651064



