*कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे पाच दिवसीय मसाला प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न,14 प्रकारचे मसाले व पाच प्रकारच्या रेडी-टू-ईट ग्रेव्ही निर्मितीचे प्रशिक्षण,समारोपप्रसंगी मसाला प्रक्रिया प
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे पाच दिवसीय मसाला प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न,14 प्रकारचे मसाले व पाच प्रकारच्या रेडी-टू-ईट ग्रेव्ही निर्मितीचे प्रशिक्षण,समारोपप्रसंगी मसाला प्रक्रिया प
*कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे पाच दिवसीय मसाला प्रक्रिया प्रशिक्षण संपन्न,14 प्रकारचे मसाले व पाच प्रकारच्या रेडी-टू-ईट ग्रेव्ही निर्मितीचे प्रशिक्षण,समारोपप्रसंगी मसाला प्रक्रिया पुस्तिकेचे प्रकाशन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या वतीने 21 ते 25 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पाच दिवसीय मसाला प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये मसाला निर्मिती, उद्योजकता विकास, विपणन, पॅकेजिंग, लेबलिंग, अन्न सुरक्षा परवाना आणि उद्योग नोंदणी या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना 14 प्रकारचे मसाले तसेच पाच प्रकारच्या रेडी-टू- ईट ग्रेव्ही तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान युथ फाउंडेशनचे शिवाजी परमार यांनी उद्योजकता विकास, व्यवसायाच्या संधी, पॅकेजिंग व लेबलिंग या विषयांवर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथील शास्त्रज्ञ सौ. अमृता राऊत यांनी रेडी-टू-ईट ग्रेव्ही निर्मितीविषयी सैद्धांतिक माहिती देऊन विविध प्रकारच्या ग्रेव्ही तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार येथील संदीप कुवर यांनी अन्न सुरक्षा परवाना आणि उद्योग नोंदणी प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ सौ. आरती देशमुख यांनी विविध 14 प्रकारचे मसाले तयार करण्याचे तांत्रिक प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणार्थींना व्यावसायिक मसाला उत्पादन प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळावी, यासाठी नंदुरबार येथील महादेव मसाले उद्योगाला भेट देऊन एक्स्पोजर व्हिजिट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान मसाला निर्मिती प्रक्रिया, उत्पादनाचे पॅकेजिंग आणि उद्योगाच्या कामकाजाविषयी माहिती घेण्यात आली. या प्रशिक्षणामुळे सहभागी महिला, बचत गट, शेतकरी व नवउद्योजकांना मसाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.
प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमाला डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कवडीवाले, आत्मा प्रकल्प संचालक दीपक पाटील आणि शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबारचे सहयोगी अधिष्ठाता उत्तम होले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी केले. समारोप प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते मसाला प्रक्रिया या विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेमुळे मसाला निर्मिती व प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना उपयुक्त माहिती उपलब्ध होणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आरती देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश पाटील यांनी केले. या पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोर्स कोऑर्डिनेटर सौ. आरती देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे प्रशिक्षणाचे विविध सैद्धांतिक व प्रात्यक्षिक सत्रे तसेच एक्स्पोजर व्हिजिट यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ जयंत उत्तरवार, पद्माकर कुंदे, उमेश पाटील, डॉ. वैभव गुरवे, डॉ. खुशाल राठोड, कार्यक्रम सहाय्यक राजेश भावसार, प्रवीण चव्हाण, विजय बागल, गीता कदम, संदीप कुवर, किरण मराठे, रजसिंग राजपूत, सौ. अश्विनी मराठे, कु. अश्विनी पाडवी आणि यांचे सहकार्य लाभले.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मसाला प्रक्रिया उद्योगातील तांत्रिक कौशल्ये, उत्पादनाचे वैविध्य, गुणवत्ता, पॅकेजिंग आणि विपणन यांविषयी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन मिळाले. स्थानिक स्तरावर प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन महिला व ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा प्रशिक्षण कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.



